- तबरेज शेख
तुमची आणि माझी भूमिका एकच आहे ना, ओबीसी आरक्षणचा (obc reservation) बचाव करणे बस्स एवढंच असे आज (मंगळवार) नाशिक येथे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी माध्यमांशी बाेलतना स्पष्ट केले. काॅंग्रेस नेते विजय वड्डेटीवार (vijay wadettiwar) यांनी जाहीर केलेल्या भूमिकेवर भुजबळांनी काेणाचे ही नाव न घेता आजचे विधान केल्याची चर्चा सुरु आहे. (Maharashtra News)
छगन भुजबळ म्हणाले मी एकटा पडलेलो नाही राज्यातील ओबीसी समाज पूर्णपणे माझ्या पाठिशी आहे. ठीक आहे काही नेते मंडळीची अडचण झाली असेल. काही जण म्हणाले आम्ही भुजबळ यांच्या स्टेजवर जाणार नाही, काही हरकत नाही, माझ्या स्टेजवर येऊ नका स्वतंत्र बैठक घ्या पण ओबीसी समाजा समवेत राहा असे आवाहन भुजबळांनी केले.
भुजबळ पुढे म्हणाले मी कुठे राज्यभर जाऊ शकणार आहे. तुम्ही रॅली घ्या, बैठक घ्या पण ओबीसीचा लढा सुरू ठेवा. काही नेते माझ्या सॊबत येतील काही जातील हे चालूच राहणार आहे. काही पक्षाच्या, काही लोकांच्या अडचणी असू शकतात. मला त्याबद्दल काही रोष नाही, या लोकांनी त्यांचे मन अंबडच्या सभेत (ambad sabha) मोकळे केले आहे असेही भुजबळांनी नमूद केले.
कुठे ही जा ओबीसीसाठी लढा माझ्या विरोधात बोलले तरी चालले पण ओबीसीच्या बाजूने बोला. दरम्यान मला कोणीही स्क्रिप्ट देऊ शकत नाही हे सर्वांना माहिती आहे. पवार साहेब, अजितदादा, फडणवीस, शिंदे कोणीही स्क्रिप्ट देऊ शकत नाही. ओबीसीचे स्क्रिप्ट मंडल आयोग, ओबीसी हे छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांचे स्क्रिप्ट आहे. बहुजन, ओबीसी समाजाचा माझं स्क्रिप्ट आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मनाेज जरांगे पाटील यांच्या सभेविषयी भुजबळ म्हणाले कोणालाही कुठेही सभा घेण्याचे अधिकार आहे. त्यांना शुभेच्छा. त्यांचे नाशिक मध्ये स्वागत आहे. मी इतर कार्यकर्त्यांप्रमाणे कोणालाही गावबंदी असे काही कोणाला करत नाही. प्रत्येकाने आपले मत मांडवी, लोकांना जे पटेल त्याबाजूने लोक जातील असेही भुजबळ यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.