chhagan bhujbal , Nashik Bus Accident, Hospital saam tv
महाराष्ट्र

Nashik Bus Accident : नाशकातील अपघातग्रस्त जखमींना छगन भुजबळांनी दिला धीर; मुख्यमंत्र्यांशीही चर्चा

बसने पेट घेतल्यामुळे काही प्रवाशांचा जागीच होरपळुन दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

साम न्यूज नेटवर्क

Nashik Bus Accident : नाशिक शहरात आज (शनिवार) झालेल्या खासगी बस आणि ट्रेलरच्या भीषण अपघातात (accident) काही प्रवाशांचा जागीच होरपळुन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने (Nashik Accident News Today) संपुर्ण महाराष्ट्र हादारलं आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी अपघातग्रस्त ठिकाणी भेट दिली. त्यानंतर रुग्णालयात जखमींची विचारपूस केली. यावेळी माध्यमांशी बाेलताना भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्याशी चर्चा केल्याचेही सांगितले. (Breaking Marathi News)

ज्येष्ठ नेते भुजबळ म्हणाले नाशिक शहरात नांदूरनाका परिसरात झालेल्या भीषण अपघाताची घटना अतिशय दुःखद आहे. बसने पेट घेतल्यामुळे काही प्रवाशांचा जागीच होरपळुन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

भुजबळ म्हणाले या अपघातामधील जळालेल्या काही लाेकांची ओळख पटविणं अशक्य झालं आहे. काही लाेकांना फ्रॅक्चर झाले आहे. काही लाेकांना जखमा झाल्या आहेत. डाॅक्टर त्यांच्यावर उपचार करीत आहेत. अन्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी देखील येताहेत. मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बाेललाे आहे. अपघातग्रस्तांना मदत कार्य सुरु आहे.

या अपघाताची कारणं समाेर येतीलच. त्यासाठी पाेलीस पंचनामा करीत आहेत. या अपघातग्रस्तांना शासनाची तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी चर्चा झाल्याचेही भुजबळ यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT