ONLINE MEDICINE SALES PROTEST: CHEMISTS ACROSS INDIA CALL 24-HOUR STRIKE AI Image
महाराष्ट्र

Chemists Strike India : औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, महाराष्ट्रात काय असेल स्थिती? जाणून घ्या

Chemists Strike Maharashtra Update : देशभरातील औषध विक्रेत्यांनी ऑनलाइन औषध विक्रीविरोधात २४ तासांचा संप पुकारला आहे. AIOCD च्या नेतृत्वाखालील या आंदोलनामुळे आरोग्य व्यवस्थेवर काय परिणाम होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती.

Alisha Khedekar

  • देशभरात २४ तासांचा केमिस्ट संप पुकारला

  • ऑनलाइन औषध विक्री आणि सवलतींविरोधात आंदोलन

  • महाराष्ट्रासह अनेक राज्यांत दुकाने सुरू राहणार असल्याने दिलासा

  • काही भागांत आरोग्य सेवांवर मर्यादित परिणाम संभव

देशभरातील औषध विक्रेत्यांनी आज ऑनलाइन औषध विक्रीविरोधात आवाज उठवत २४ तासांच्या संपाचे आवाहन केले असून, या संपाचा आरोग्य व्यवस्थेवर किती परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स’ (AIOCD) या संघटनेच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारण्यात आला आहे. संघटनेच्या दाव्यानुसार, देशभरातील सुमारे १५ लाखांहून अधिक केमिस्ट आणि औषध विक्रेते या आंदोलनात सहभागी होत आपली दुकाने बंद ठेवणार आहेत.

या संपामागील मुख्य कारण म्हणजे ई-फार्मसी प्लॅटफॉर्म्सद्वारे दिल्या जाणाऱ्या मोठ्या सवलती आणि ऑनलाइन औषध विक्रीवरील नियंत्रणाचा अभाव. AIOCD च्या मते, अनियंत्रित ऑनलाइन विक्रीमुळे पारंपरिक औषध दुकानदारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. त्याचबरोबर, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे उपलब्ध होण्याची शक्यता वाढल्याने रुग्णांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती संघटनेने व्यक्त केली आहे.

मात्र, या संपाबाबत देशभरात एकसमान प्रतिसाद दिसून येत नाही. ‘केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था’ (CDSCO) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक राज्यांतील औषध विक्रेता संघटनांनी या संपापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब, हरियाणा, गुजरात, छत्तीसगड, सिक्कीम, उत्तराखंड आणि लडाख या राज्यांतील संघटनांनी लेखी आश्वासन देत औषध दुकाने सुरू ठेवण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना औषधांचा तुटवडा भासणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आपत्कालीन औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. तरीही, कर्नाटकातील काही भाग आणि मध्य प्रदेशमध्ये या संपाचा अधिक परिणाम जाणवू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे ऑनलाइन औषध विक्रीमुळे ग्राहकांना सवलती आणि सोयी मिळत असल्या, तरी दुसरीकडे औषधांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नाशिक महानगरपालिकेची आज होणार ऑफलाईन महासभा

Kelphulachi Bhaji Recipe : केळफुलाची भाजी कधी खाल्ली आहात का? वाचा झटपट होणारी पारंपरिक रेसिपी

Weather Update: चक्रीवादळाचं संकट! १३ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कसं असेल हवामान? पाहा IMD चा अलर्ट

Riteish - Raja Shivaji Collection :'राजा शिवाजी'चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, रितेश भाऊंच्या ऐतिहासिक चित्रपटाची १९ व्या दिवशीही तगडी कमाई

पाकिस्तानच्या चौकांना हिंदू देव-देवतांची नावं; ऐतिहासिक निर्णयामागे पाकची मखलाशी?

SCROLL FOR NEXT