Aurangabad News  Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad News : औरंगाबादेत केमिकलचा भीषण स्फोट, घर कोसळले; एकाचा जागीच मृत्यू

Chemical Blast In Aurangabad: औरंगाबादच्या हर्सूलजवळील घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवनीत तापडिया

Aurangabad Latest News : औरंगाबादच्या हर्सूल परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टँकर मागे घेतना त्यामधील केमीकल खाली पडून झालेल्या स्फोटामुळे एक तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाला हे. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली.

तर या घटनेत त्याचे आई-वडील आणि भाऊ जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. रात्रीच्या सुमारास झालेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून (Police) मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद (Aurangabad) येथील हर्सूल परिसरातील चेतनानगर येथील वीटभट्टीजवळ ही घटना घडली आहे. भावनेश पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. तर नंदु पवार, चंदा पवार आणि योगेश पवार अशी जखमींची नावे आहेत. पवार कुटुंब मजुरीचं काम करायचे, ते कच्च्या घरात राहत होते. केमिकलच्या स्फोटामुळे या घराला जोरदार हादरा बसला आणि घर मजुरांच्या अंगावर कोसळले.

हर्सूल परिसरातल्या चेतनानगर येथे असलेल्या वीटभट्टीजवळ पवार कुटुंब वास्तव्यास आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास टँकर मागे घेत असताना त्यामधील केमीकल खाली पडले आणि त्याचा स्फोट झाला. या स्फोटाच्या हादराने घर कोसळलं. या घटनेत एका मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तीन जण जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Songwriter Death: प्रसिद्ध गीतकाराचे निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

कोहिनूर हिऱ्याची किंमत किती आहे?

Local Bodies Election Supreme Court: ठरलं! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत सर्वात मोठी बातमी, या तारखेपर्यंत होणार निवडणुका | VIDEO

Jalna Heavy Rain : जालन्यात पावसाचा कहर; १५ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी, शेतीचे अतोनात नुकसान

Hardik Pandya Rumoured Girlfriend : हार्दिकच्या आयुष्यात स्टायलिश अभिनेत्रीची एन्ट्री? कोण आहे पंड्याची नवी गर्लफ्रेंड?

SCROLL FOR NEXT