27 Schools To Be De-Recognised In Pune District. Saam Tv
महाराष्ट्र

पुणेकरांनाे सावधान! 34 शाळांवर मान्यता रद्दची टांगती तलवार; जाणून घ्या यादी

सध्या राज्यातील विविध जिल्ह्यात शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याने शिक्षण विभाग सतर्क झाले आहे.

Siddharth Latkar

पुणे : राज्य (maharashtra) शिक्षण विभागाने पुणे (pune) जिल्ह्यातील 27 शाळांची (pune schools) मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, तर सात शाळांबाबत (schools) सुनावणी सुरू असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक दिनकर टेमकर (Dinkar Temkar) यांनी दिली. संबंधित संस्थांना शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकारचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) आवश्यक आहे. या शाळांनी युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन (UDISE) पोर्टलवर आवश्यक तपशील दिला नसल्याने करावाईचे संकेत टेमकर यांनी दिले आहेत. (pune schools latest marathi news)

टेमकर म्हणाले संबंधित शैक्षणिक संस्थांकडून प्रत्येकी एक लाख रुपये दंड आणि शाळा सुरू राहिल्यास प्रतिदिन दहा हजार रुपये दंड आकारला जाईल. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी पाल्याचा शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी पालकांनी संबंधित संस्थेचे खात्री करावी असे आवाहन केले. मांढरे म्हणाले पालकांची फसवणुक हाेऊ नये यासाठी शिक्षण विभाग सतर्क आहे.

शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनूसार पुणे जिल्ह्यातील 34 संस्थांनी अद्याप शाळा सुरु करण्यासाठीची परवानगी घेतलेली नाही.

मास्टर केअर इंग्लिश स्कूल, भोसरी

इंद्रायणी इंग्लिश मिडीयम स्कूल, दिघी

ग्रँड मीराइंग्लिश मिडीयम स्कूल, चिखली

विश्वरत्न इंग्लिश मिडीयम स्कूल, ताम्हणेवस्ती

उत्कर्ष मध्यमिक विद्यालय (वडगाव धायरी)

एस.टी. झेवियर्स प्राथमिक शाळा (आनंद नगर, हिंगणे खुर्द)

न्यू होरायझन इंग्लिश मिडीयम स्कूल (मिठानगर, कोंढवा)

द ऑक्रिज इंटरनॅशनल स्कूल (मिठानगर, कोंढवा)

इक्रा इस्लामिक स्कूल आणि मकतब (रामटेकडी, वानोवरी)

केअर फाउंडेशन इमॅन्युएल पब्लिक स्कूल (कोंढवा)

ट्विन्स लँड इंग्लिश प्रायमरी स्कूल (कोंढवा बुद्रुक)

कल्पवृक्ष इंग्रजी शाळा (किरकटवाडी)

क्रेझ इंग्लिश मीडियम स्कूल (गोर्हे बु कोळेवाडी)

सोनई इंग्लिश मीडियम स्कूल (फुरसुंगी)

केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल (खडकी)

इमॅन्युएल पब्लिक स्कूल (लोहेगाव)

वसुंधरा स्कूल (लोणीकंद, बकोरी)

शिव समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल (मांगडेवाडी आंबेगाव ख.)

न्यूटन इंग्लिश मीडियम स्कूल (मांगडेवाडी)

ट्री हाऊस हायस्कूल शेवाळेवाडी

लिटल हार्ट इंग्लिश स्कूल (बेलवाडी लासुर्णे, इंदापूर)

आश्रमशाळा पलासदेव (न्हावी पलासदेव, इंदापूर)

गौतमेश्वर प्राथमिक शाळा (शेलगाव, गोतोंडी)

ज्ञानराज प्राथमिक शाळा (कासारवाडी)

एम.एस. मुलांसाठी शाळा (नवी सांगवी)

मॉडर्न पब्लिक स्कूल, रहाटणी

समर्थ माध्यमिक विद्यालय केशवनगर, थेरगाव

नवीन मॉडेल इंग्लिश मिडीयम स्कूल, सासवड

आकांशा विशेष बालशिक्षण शिरूर

लेडी ताहेरुन्निसा इनामदार इंग्रजी माध्यमिक विद्यालय, वडगावशेरी

लिटल फ्लॉवर माध्यमिक शाळा, साईनंतनगर

फिनिक्स इंग्रजी माध्यमिक विद्यालय, साईनंतनगर

पुणे इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई, धानोरी

महात्मा गांधी शाळा, नागपूर चाळ, येरवडा

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT