Beed Online Fraud
Beed Online Fraud Saam TV
महाराष्ट्र

शिक्षकाची फसवणूक; पॅनकार्डचा नंबर वापरुन काढलं GST खातं; कोट्यावधीचा गैरव्यवहार

विनोद जिरे

बीड : बीडमध्ये एका शिक्षकाच्या पॅनकार्डचा (PanCard) क्रमांक वापरून अज्ञात व्यक्तीने जीएसटी (GST) खाते उघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवाय या प्रकरणात ३ वर्षाच्या कालावधीत तब्बल ३ कोटी ९६ लाख ८७ रुपयांचे व्यवहार झाल्याचे दिसून आले आहे.

अनिल भानुदास जरे रा. आदित्यनगर , बीड (Beed) असे त्या फसवणूक झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. २४ जुलैला इन्कमटॅक्स फाईल करण्यासाठी शिक्षक जरे हे गेले असता त्यांना त्यांच्या पॅन क्रमांकावर जीएसटीआयएन नंबर सुरू केल्याचे समजलं. सदरील जीएसटीआयएन क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने व्यवसायाचे नावे भानुदास इंड्रस्ट्रीज तर प्रोप्रायटर म्हणून अनिल भानुदास जरे अशा नावाचा गैरवापर केला आहे.

पाहा व्हिडीओ -

संबंधित व्यवसायासाठी अ - ९ रेणुका नगर एमआयडीसी , अहमदनगर महाराष्ट्र असा पत्ता दिलेला आहे. असून जीएसटीआयएनसाठी ई - केवायसी झालेली नाही . या अज्ञात व्यक्तीने २०२०-२१ मध्ये आर 3 बी नुसार ३२ लाख ५० हजार ४५ , आर -1 नुसार ५ लाख ८२ हजार , २०२१-२२ मध्ये १ कोटी ९० लाख १० हजार ७०० तर आर -1 नुसार १ कोटी ६८ लाख ४६ हजार रुपयांचा व्यवहार केला असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sam Pitroda Resigns: वादग्रस्त विधानाने काँग्रेसला टाकलं गोत्यात; सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा; काय होता वाद?

Nagpur Earthquake : नागपूर जिल्हा चौथ्यांदा हादरला, बुधवारी 4 वाजता पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के

Today's Marathi News Live : मोठी बातमी! वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेले काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांचा राजीनामा

Delhi News: दिल्ली पोलिसांची ७ राज्यात मोठी कारवाई; गोल्डी ब्रार टोळीच्या १० शार्प शूटर्सना अटक

JP Nadda: सात दिवसांत पोलीस ठाण्यात हजर व्हा, जेपी नड्डा यांना कर्नाटक पोलिसांची नोटीस

SCROLL FOR NEXT