हनी ट्रॅपच्या माध्यमातून एका वकिलाची फसवणूक  संजय तुमराम
महाराष्ट्र

हनी ट्रॅपच्या माध्यमातून एका वकिलाची फसवणूक

बदनामीची भीती मनातून काढत वकिलाने पोलिसात तक्रार दिली.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर - हनी ट्रॅपच्या माध्यमातून एका वकिलाला फसवण्याचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात करंजी गावातील एका वकिलाला मोबाईलवर एक मुलीचा फोन आला. फोनवर संभाषण करतानाच तिने जाळे फेकले आणि यात हे वकील अडकले. बोलाचालीचा हा सिलसिला पुढे व्हीडीओ कॉलिंगपर्यंत गेला आणि त्यात सगळ्या अश्लील हरकती सुरू झाल्या. त्यानंतर मुलीने रंग दाखवायला सुरुवात केली.

हे देखील पहा -

मुलीने पैशांची मागणी सुरू झाली. पैसे दिले नाही तर सोशल मीडियावर सार्वत्रिक बदनामी करू, अशी धमकी ही मुलगी वकिलाला देऊ लागली. धमकीमुळे हा वकील घाबरला आणि काही मित्रांना घडलेली घटना सांगितली. मित्रांनी वकिलाला धीर देत पोलिसात जाण्याचा सल्ला दिला. शेवटी बदनामीची भीती मनातून काढत वकिलाने पोलिसात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, अशा प्रकारांना लोकांनी बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Repo Rate : नव्या वर्षात EMI कमी होणार, RBI पुन्हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, वाचा अपडेट

Maharashtra Live News Update: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार; या तारखेला करणार युतीची घोषणा

Shocking : पुण्यातून निवडणूक निकालसाठी गावाकडे गेला अन् खून झाला, चाकू-काठीने बेदम मारलं, लातूरमधील धक्कादायक घटना

Politics: ठरलं तर मग! पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, २५-२६ डिसेंबरला करणार घोषणा

Diabetes skin symptoms: त्वचेवर दिसतात ही ७ लक्षणं, लगेच व्हा सावध, कधीही कंट्रोल न होणारा डायबेटिस होण्याचा धोका

SCROLL FOR NEXT