Chatrapati Sambhaji Nagar News SAAM TV
महाराष्ट्र

Chatrapati Sambhaji Nagar : मढी यात्रेसाठी निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला! गोदापात्रात बुडालेल्या चारही तरुणांचा मृत्यू

Chatrapati Sambhaji Nagar News:छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर रोडवरील कायगाव टोका येथील प्रवरासंगम गोदावरी नदीत चार जण बुडाल्याची घटना घडली आहे.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

Chatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कायगाव टोका येथे सिध्देश्वर मंदिराजवळ गोदावरी नदीत चार तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की वैजापूर तालुक्यातील काही तरुण कावडीने पाणी नेण्यासाठी कायगाव येथे आले होते. दरम्यान आंघोळीसाठी गोदावरीत उतरल्याने त्यांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला.

बाबासाहेब अशोक गोरे (वय 35), नागेश दिलीप गोरे (वय 20), आकाश भागिनाथ गोरे (वय 20) आणि शंकर पारसनाथ घोडके (वय 22) अशी पाण्यात बुडालेल्या चार तरुणांची नावे आहेत. हे चौघेही वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील रहिवासी आहेत.

शनिवारी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. दरम्यान शंकर पारसनाथ घोडके याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून अन्य तिघांचे मृतदेह शोधण्यासाठी मोहीम राबवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

INDIA Alliance Protest: विरोधकांच्या मोर्चादरम्यान महिला खासदार बॅरिगेट्सवर चढल्या, घोषणाबाजी करताना दोघी चक्कर येऊन पडल्या

Radhakrishna Vikhe Patil : केवळ आरोप करून आरक्षण मिळणार आहे का? मंत्री विखे पाटील यांचा जरांगे पाटील यांना सवाल

Dashavatara: बाप-मुलाच्या धमाल नात्याची झलक 'आवशीचो घो'मध्ये; 'दशावतार'मधील पहिलं गाणं प्रदर्शित

Women's World cup 2025: क्रिकेट वर्ल्डकपचं काउंटडाऊन सुरु! ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा कर्णधार हरमनप्रीत कौरचा निर्धार

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र सरकारमधील कलंकित मंत्र्याची हकालपट्टी करा; ठाकरे गटाकडून जन आक्रोश आंदोलन

SCROLL FOR NEXT