Anjaneri Saam
महाराष्ट्र

Anjaneri Hill: अंजनेरी पर्वतावर मधमाशांचा भाविकांवर हल्ला, ७० ते ८० भाविक जखमी; हनुमान मंदिराबाहेर एकच गदारोळ

Bee Attack on Devotees at Anjaneri Hill on Jayanti: हनुमान जयंतीच्या दिवशी अंजनेरी पर्वतावर दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला.

Bhagyashree Kamble

हनुमान जयंतीच्या दिवशी अंजनेरी पर्वतावर दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला आहे. या हल्ल्यात ७० ते ८० भाविक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

हनुमान जयंतीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी अंजनेरी पर्वतावर असलेल्या मंदिरात जमली आहे. दर्शन घेण्यासाठी पर्वतावर भाविक जमले आहेत. अचानक त्या ठिकाणी मधमाशांनी भाविकांवर हल्ला केला. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही भाविक जखमी झाले असल्याची माहिती आहे. तसेच भाविकांमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला आहे.

हनुमान जयंतीच्या निमित्ताने हजारो संख्येनं भाविक नाशिकच्या अंजनेरी पर्वतावर येतात. दरवर्षी या ठिकाणी गर्दी जमते. यंदाही सकाळपासून भाविकांची मंदिराबाहेर रेलचेल पाहायला मिळत आहे. अशातच हनुमान जयंतीसाठी आलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला. अचानक मधमाशांचा थवा भाविकांवर तुटून पडला. त्यामुळे काही काळ परिसरात भाविकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

भाविकांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. तर, काहींनी स्वत:ला कापडाने झाकून मंदिरात प्रवेश केला. या घटनेनंतर अनेक भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. अनेक भाविकांवर मधामाशांनी दंश केला आहे. काही भाविक किरकोळ जखमी झाले आहेत, त्यांना तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले. अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT