Shruti Vilas Kadam
फक्त 3 ग्रॅम वजनाचे हलके मंगळसूत्र रोजच्या वापरासाठी आरामदायी ठरते. ऑफिस, कॉलेज किंवा प्रवासातही ते सहज घालता येते.
काळे मणी आणि छोट्या गोल्ड पेंडंटचे कॉम्बिनेशन असलेले मंगळसूत्र साधे असूनही आकर्षक दिसते.
पानाच्या आकाराचा पेंडंट असलेले मंगळसूत्र निसर्गप्रेमी आणि ट्रेंडी महिलांसाठी उत्तम पर्याय आहे.
इन्फिनिटी (Infinity) डिझाइनचे मंगळसूत्र कायमस्वरूपी प्रेम आणि नात्याचे प्रतीक मानले जाते. हे डिझाइन सध्या ट्रेंडमध्ये आहे.
पारंपरिक पिवळ्या सोन्याऐवजी रोज गोल्ड फिनिश असलेले मंगळसूत्र मॉडर्न आणि स्टायलिश लूक देते.
हलके असल्याने दिवसभर मानेला ताण जाणवत नाही. शिवाय कमी वजनामुळे किंमतही परवडणारी असते आणि रोज वापरासाठी ते अधिक सोयीचे ठरते.
सोन्याच्या दरानुसार किंमत बदलत असते. सध्याच्या बाजारभावानुसार 3 ग्रॅम सोन्याच्या मंगळसूत्राची किंमत साधारण 30,000 ते 40,000 (मेकिंग चार्जेस, GST आणि डिझाइननुसार अधिक किंवा कमी) असू शकते. खरेदीपूर्वी त्या दिवसाचा सोन्याचा दर नक्की तपासावा.