Shruti Vilas Kadam
चिया सीड्स काही वेळ पाण्यात भिजवून दह्यात मिसळा. त्यात फळे आणि ड्रायफ्रूट्स घातल्यास पौष्टिक आणि चविष्ट नाश्ता तयार होतो.
केळी, आंबा, बेरीज किंवा इतर फळांच्या स्मूदीमध्ये चिया सीड्स घातल्यास फायबर आणि ओमेगा-3 चे प्रमाण वाढते.
सकाळच्या ओट्स किंवा पोरीजमध्ये चिया सीड्स मिसळल्याने नाश्ता अधिक पौष्टिक होतो आणि पोट जास्त वेळ भरलेले राहते.
भाज्या किंवा फ्रूट सॅलडवर चिया सीड्स शिंपडल्याने त्याची पौष्टिकता वाढते आणि हलका कुरकुरीत टेक्स्चर मिळतो.
दूध किंवा वनस्पतीजन्य दुधात चिया सीड्स भिजवून त्यात मध आणि फळे घालून हेल्दी चिया पुडिंग तयार करा.
पिठात चिया सीड्स घालून चपाती किंवा पराठे बनवल्यास रोजच्या आहारात सहजपणे त्यांचा समावेश करता येतो.
चिया सीड्स नेहमी पुरेशा पाण्यात भिजवून किंवा भरपूर पाण्यासह खा. प्रमाणात सेवन करा आणि कोणतीही आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.