chandur bazar bandh today  Saam Tv
महाराष्ट्र

Chandur Bazar Bandh: चांदूर बाजार शहरात कडकडीत बंद, पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त

amravati's chandur bazar bandh today: या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी गुन्हे दाखल केले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पाेलिसांनी बंदाेबस्त ठेवला आहे.

Siddharth Latkar

- अमर घटारे

अमरावती लाेकसभा निवडणुकीच्या निकालानंतर चांदूर बाजार शहरात दाेन गटात वादावादी झाली. त्यातून मारामारीचा प्रकार देखील घडला. हे प्रकरण पाेलिस ठाण्यापर्यंत पाेहचले. दरम्यान भाजप व हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या आवाहनानूसार आज (गुरुवार) चांदूर बाजार शहरात कडकडीच बंद पाळण्यात आला आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार बळवंत वानखडे यांच्या विजया निमित्त अमरावतीच्या चांदुर बाजार मध्ये काल सायंकाळी विजय रॅली काढण्यात आली. यावेळी जल्लोष सुरु असताना काही तरुणांची आणि रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांमध्ये वाद झाला. हा वाद मारामारी पर्यंत गेला.

त्यानंतर काही संघटना चांदुर बाजार पोलिस ठाणे येथे धडकल्या. रॅली काढणाऱ्या काही युवकांबाबत त्यांनी तक्रार केली. या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी गुन्हे दाखल केले. दरम्यान आज चांदुर बाजार शहर बंदचे आवाहन भाजपा व हिंदुत्ववादी संघटनांनी केले हाेते. त्यानूसार आज शहरातील बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पाेलिसांनी बंदाेबस्त ठेवला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT