चंद्रिका नदीवरील उभारलेला कोल्हापुरी बंधारा गेला वाहून; पिकांचे नुकसान
चंद्रिका नदीवरील उभारलेला कोल्हापुरी बंधारा गेला वाहून; पिकांचे नुकसान Saam Tv
महाराष्ट्र

चंद्रिका नदीवरील उभारलेला कोल्हापुरी बंधारा गेला वाहून; पिकांचे नुकसान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अकोला : अकोट Akot तालुक्यातील मुंडगाव Mundgaon लामकाणी Lamkani येथील चंद्रिका नदीवर उभारण्यात आलेल्या कोल्हापुरी Kolhapuri बंधारा Dam फुटल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या बंधाऱ्याच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे येथील शेतकऱ्यांची शेत जमीन वाहून गेली आहे. बंधारा फुटल्याने उर्वरित पीके आता पाण्याखाली आली आहे.

रक्ताचे पाणी करून मोठ्या कष्टाने या शेतकऱ्यांनी शेती फुलवलेली.त्यानंतर पीक ही डवरली होती. उभे पीक पाहून डोळे आपसूक पाणावले असताना काळाने घाला घातला. आलेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रिका नदीला पूर आला होता. लामकाणी गावातून शहापूर शिवारामधून जाणाऱ्या चंद्रिका नदीवर कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले होते.

हे देखील पहा-

फेब्रुवारी २०१९ मध्ये या बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले तेव्हापासून येथील ग्रामस्थ बंधाऱ्याच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत तक्रार करीत आहे, दरम्यान बंधाऱ्याच्या बाजूला असलेल्या तमीज खा पठाण यांचे ९ एकर शेतातील उभे पीक खरडून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.बंधाऱ्याच्या निर्मितीपासून सतत तीन वर्षे पिकांचे अतोनात नुकसान होत असून अद्याप पर्यंत कुठलीही आर्थिक मदत मिळाली नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

याबाबत लघु पाटबंधारे विभागाला वेळोवेळी तक्रार दाखल करूनही न्याय मिळत नसल्याने अखेर या शेतकऱ्याने स्वातंत्र्यदिनी जलसंधारण अधिकारी यांच्या कार्यालयात बाहेर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे या कोल्हापुरी बंधाऱ्याला कुठेच संरक्षण भिंत नसल्याने आजूबाजूची शेत जमीन पुरामुळे खचत जात आहे.

या आठवड्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे पाणी बंधार्‍यावरून न जाता बाजूने गेल्याने बंधाऱ्याच्या दोन्ही कराडा वाहून गेल्या आहेत. त्यामुळे नदीकाठावर मोठे भगदड पडले असून पाणी संपूर्ण शेतात शिरले आहे.संबंधित अधिकारी तथा कंत्राटदाराच्या दुर्लक्षित पणामुळे आपल्या शेतीचे नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांनी केला आहे. मुख्य अभियंता लघु पाटबंधारे विभाग अकोला यांना वेळोवेळी बंधाऱ्याच्या दुरुस्ती संदर्भात पत्रव्यवहार करूनही कुठलीही कारवाई केली नसल्याने आज पावसाने बंधारा उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे बंधाऱ्याचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर व कामचुकार अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Food for Diabeties : मधुमेहाचे रुग्ण करु शकतात 'या' गोड पदार्थांच सेवन

Acidity Problem : उन्हाळ्यात सतत अ‍ॅसिडीटीचा त्रास होतोय? हे ड्रिंक प्या

Today's Marathi News Live : नागपूरनंतर गोव्यातील विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Tejasvee Ghosalkar News | तेजस्वी घोसाळकरांचा निवडणूक लढण्यास नकार, काँग्रेसचा उमेदवार कोण?

T20 World Cup 2024: वर्ल्डकपआधी पाकिस्तान संघात मोठा बदल! टीम इंडियाला चॅम्पियन बनवणाऱ्या दिग्गजाचा संघात समावेश

SCROLL FOR NEXT