satara,chandrashekhar bawankule, afzal khan tomb saam tv
महाराष्ट्र

ChandrasheKhar Bawankule: '...ते प्रकाश आंबेडकरांना काय सांभाळणार' बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका; अजित पवारांचाही घेतला समाचार

जे स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाही ते काय प्रकाश आंबेडकर यांना सांभाळतील, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे, त्याचबरोबर त्यांनी अजित पवारांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला आहे.

Gangappa Pujari

Chandrashekhar Bavankule: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उत आला होता. या भेटीनंतर बंचित बहुजन आघाडी शिंदे गटासोबत युती करणार, अशाही चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांनंतर प्रकाश आंबेडकरांनी आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करणार आहोत, असे स्पष्टिकरण दिले होते.

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या या वक्तव्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. मात्र या भेटीनंतरही आम्ही शिवसेनेसोबत युती करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाही ते काय प्रकाश आंबेडकर यांना सांभाळतील, असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

याबद्दल बोलताना "उद्धवजीसोबत कुणीही राहू शकत नाही, स्वतः त्यांचे आमदार त्यांच्यासोबत नाहीत, जे स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाही ते काय प्रकाश आंबेडकर यांना सांभाळतील, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

त्याचबरोबर "प्रकाश आंबेडकर विद्वान आहे त्यांना सगळं कळते,उद्धवजी सोन्याच्या चमच्याने बदाम पिऊन मोठे झालेले नेते आहेत. त्यांच्या रक्तातच युती टिकवणे नाही,ते कुणाचाच सन्मान ठेऊ शकत नाहीत, त्यामुळेच प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंसोबत जाणार नाहीत," असा खुलासाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

यावेळी अजित पवारांच्या (Ajit Pawar) वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला आहे. अजित पवार यांनी भाजपा नेते वाचाळवीर असल्याचे वक्तव्य केले होते. याबद्दल बोलताना त्यांनी "वाचाळवीर कोण हे राज्याला माहीत आहे, अजित पवार मी कुणाच्या बापाला घाबरत नाही असे सभागृहात बोलतात त्यांना हे शोभत का, जनतेला खरे वाचाळवीर कोण माहीत आहे.. संभाजीराजे धर्मवीर आहेत मात्र अजित पवारांना ते मान्य नाही," अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी! बंद झालेला ₹1500 चा हप्ता पुन्हा सुरू होणार, आदिती तटकरेंनी दिली अपडेट

Maharashtra News Live Update:एसआयआर मोहिमेदरम्यान महिला बीएलओला धक्काबुक्की, मायलेकीवर गुन्हा दाखल

Marathi Actress : 'वीण दोघांतली ही तुटेना' फेम अभिनेत्रीने खरेदी केली लग्जरी कार, नव्याकोऱ्या गाडीसोबत शेअर केला PHOTO

Crime News: स्मार्ट सिटी दाखवतो म्हणत सोबत नेलं, खोलीत कोंडून ठेवत ४ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार नंतर...

अमरावतीत भरदिवसा थरार! तरुणाची निर्घृण हत्या, हाताचा पंजाच छाटल्याने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT