Chandrashekhar Bawankule Vs Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule: "चांद्रयान मोहिमेबद्दल आनंद साजरा होत असताना उद्धव ठाकरेंना पोटदुखी"; सामनाच्या अग्रलेखावर बावनकुळेंचं चोख प्रत्युत्तर

Chandrashekhar Bawankule On Samana Editorial: प्रत्युत्तर देताना बावनकुळेंनी म्हटलं की, "ज्यांच्या पक्षाचे यान पूर्णपणे भरकटले आहे ते उद्धव ठाकरे आज चांद्रयान मोहीमेवरून टीका करत आहेत.

Ruchika Jadhav

Chandrashekhar Bawankule News:

एकिकडे चांद्रयान -३ च्या यशानंतर संपूर्ण देशभर आनंद व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे राज्यातील शेतकरी निर्यात शुल्कावरुन नाराज आहेत. या सर्वपरिस्थितीवरुन आजच्या सामना आग्रलेखातून मोदी सरकारवर ताशेरे ओढण्यात आलेत. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील शिवसेनेला (ठाकरे गट) चोख प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

"तुम्ही सूर्याच्या दिशेने जरूर यान सोडा, पण आधी कांद्याचे 'यान' लॅण्ड करा! नाहीतर 2024 मध्ये तुमचे सत्तेचे यान कसे भरकटेल हे तुम्हालाही कळणार नाही!", असा हल्लाबोल सामनातून भाजपवर करण्यात आला आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना बावनकुळेंनी म्हटलं की, "ज्यांच्या पक्षाचे यान पूर्णपणे भरकटले आहे ते उद्धव ठाकरे आज चांद्रयान मोहिमेवरून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. करोना काळात जे घरात बसून जागतिक आरोग्य संघटनेला सल्ला देऊ शकतात. त्यांच्यासाठी चांद्रयानावर बोलणं म्हणजे आश्चर्य नाही."

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करत बावनकुळेंनी आपल्या ट्वीटमध्ये पुढे लिहिसं आहे की, "संपूर्ण जगात चांद्रयान मोहिमेच्या यशाबद्दल भारताचे कौतुक होत असताना आणि या यशाचा संपूर्ण भारतीय आनंद साजरा करीत असताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला आहे. अर्थात या दोघांचा हा त्रास काही नवीन नाही. दीड वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी या दोघांच्याही पोटदुखीवर जालीम औषध दिलं होतं पण तरीही दोघांचा पोटदुखीचा आजार काही कमी झाला नाही."

"कांद्याच्या प्रश्नी देवेंद्रजींनी जापानमधून लक्ष घातल्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचे अश्रू अद्याप थांबले नाहीत. त्यामुळे आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या घरच्या वृत्तपत्रातून गरळ ओकली.", अशा शब्दांत बावनकुळेंनी हल्लाबोल केला आहे.

"उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाचे यान संजय राऊत यांच्या नेतृत्वात भरकटलेले आहे. सध्या त्यांनी त्याची चिंता करावी. देशाची चिंता करण्यासाठी मोदीजी आणि राज्याची काळजी घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल.", असा इशारा बानकुळेंनी संजय राऊतांना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT