Chandrashekhar Bawankule on Revenue Ministry Saam tv
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule: महसूल खातं कुणामुळं मिळालं? चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका शब्दात दिलं उत्तर

Chandrashekhar bawankule on Revenue ministry:'मला महसूल खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री यांनी दिली आहे. मी माझं काम सुरू केलेय, जनतेला महसूल खात्याकडून होणारा त्रास थांबेल' - चंद्रशेखर बावनकुळे

Bhagyashree Kamble

राज्यात विधिमंडळाच्या शेवटच्या दिवशी खातेवाटप करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं मिळणार याची चर्चा होती? अशातच चंद्रशेखर बावनकुळे यांना वजनदार खातं अर्थात महसूल खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. महसूल खात्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

'मला महसूल खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. संपूर्ण महसूली कायद्यांना, शेतकरी शेतमजुरांना, समाजातील शेवटच्या माणसाशी संबंध असलेल्या महसूल खात्याच्या कायद्याक सुधारणा करणं गरजेचं आहे. असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तसेच छोट्या कारणांमुळे विकास प्रकल्प थांबल्या आहेत. त्याला पुढे नेण्याचं काम करू. ८६ हजार हेक्टर झुडपी जंगल नसताना त्याची नोंद करण्यात आली आहे, सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरू आहे. लवकर याबाबतचा निर्णय येईल, पण मी माझं काम सुरू केलेय' असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

'विदर्भातील झुडपी जंगल जमिनीमुळे विकास प्रकल्प थांबले आहेत. सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारच्या बाजूने मी भूमिका मांडेन. तसेच रेती माफिया बंद होईल. यासाठी देखील प्रयत्न करू' असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

'देशात काय सुलभीकरण झालं हे जनेतेला घरी बसून संपूर्ण डॉक्युमेंट ऑनलाईन काढता येईल. जनतेची फरपट थांबेल, असा बदल करून जनतेला देऊ. महसूल खात्याकडून होणारा त्रास लवकर थांबेल'. असं विश्वासही चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

लवकर पालकमंत्री पदाचा वाटप

१२ जिल्ह्यात मंत्री नसले तरी, या पद्धतीने खातेवाटप झालं आहे. तर, त्याच पद्धतीनं लवकर पालकमंत्री पदाचा वाटप होईल. खातेवाटप होताच पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. अशातच पालकमंत्री पदावरून कोणताही वाद होणार नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं'.

भाजप ऑन ॲक्शन मोड

'राज्यात भाजपनं नवीन सदस्यत्व अभियनाला सुरूवात केलीय. यावर्षी १ कोटी ५० लाख सदस्य संख्या करण्याचं लक्ष आहे. पक्षानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी कंबर कसली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आगामी निवडणुकांसाठी प्रत्येक पातळीवर भाजप मजबूत तयारी करत आहे. प्रत्येक कार्यकर्ता घराघरात पोहोचून जनतेशी थेट संवाद साधेल' असं बावनकुळे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Sushil Kedia: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

SCROLL FOR NEXT