Chandrapur : छोट्या पाईपमध्ये अडकला वाघ अन् झालं असं काही... संजय तुमराम
महाराष्ट्र

Chandrapur : छोट्या पाईपमध्ये अडकला वाघ अन् झालं असं काही...

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा-गोंडपिंपरी मार्गावरील चेक-आष्टा येथे रस्त्याखालून जाणाऱ्या एका छोट्या पाईपमध्ये वाघ शिरला खरा; मात्र त्यातून त्याला बाहेर पडणे मुश्किल झाले.

संजय तुमराम साम टीव्ही चंद्रपूर

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा-गोंडपिंपरी मार्गावरील चेक-आष्टा येथे रस्त्याखालून जाणाऱ्या एका छोट्या पाईपमध्ये वाघ शिरला खरा; मात्र त्यातून त्याला बाहेर पडणे मुश्किल झाले. रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांना वाघाच्या डरकाळीचा आवाज ऐकू येत होता. मात्र, वाघ नक्की आहे कुठे याबाबत कोणालाही थांगपत्ता लागत नव्हता.

हे देखील पाहा :

हा वाघ रस्त्याखाली असणाऱ्या चिंचोळ्या पाईपमध्ये अडकल्याचे काही जणांच्या लक्ष्यात आले. त्यांनी तातडीने याबाबत वन विभागास माहिती दिली. वन विभाग घटनास्थळी येईपर्यंत घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. वाघाला जेरबंद करण्यासाठी शेकडो लोकांचा जमाव घटनास्थळी जमला. तर वनविभागाची टीम देखील वाघाच्या रेस्क्यूसाठी दाखल झाली.

चेक-आष्टा या गावात आज सकाळी ११ च्या दरम्यान वाघाने बकरी मारली होती. त्यामुळे गावकरी या वाघाच्या शोधात होते. दुपारी काही गावकऱ्यांना हा वाघ पाईपमध्ये अडकून बसल्याचे आढळून आले. लोकांपासून पळतांना वाघ या पाईपमध्ये शिरला, पाईप दुसऱ्या बाजूने बंद असल्याने वाघ पाईप मध्ये अडकून पडला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार...

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT