Bhadrawati BJP City Chief Resigns Saam
महाराष्ट्र

भाजपाला मोठा धक्का! बड्या नेत्याकडून ऐन निवडणुकीत रामराम, काँग्रेसच्या 'हाता'ला दिली साथ

Bhadrawati BJP City Chief Resigns: चंद्रपुरात भाजपला धक्का. भाजपचे भद्रावती शहराध्यक्ष सुनील नामोजवार यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Bhagyashree Kamble

  • भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत भाजपला धक्का

  • शहराध्यक्ष काँग्रेसमध्ये दाखल

  • नगराध्यक्ष पदाची उमेदवारीही जाहीर

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक पक्षाने नगरपरिषद तसेच नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले आहेत. या निवडणुका २-३ डिसेंबरला पार पडतील. याच पार्श्वभूमीवर चंद्रपुरात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. चंद्रपुरातील भद्रावती येथे भाजप पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शहराध्यक्षांनी भाजपला सोडचिठ्ठी देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे भद्रावती शहराध्यक्ष सुनील नामोजवार यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील नामोजवार यांना काँग्रेसने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली आहे.

सुनील नामोजवार भद्रावती नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिले आहेत. यावेळीही त्यांना उमेदवारीची अपेक्षा होती. मात्र, शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या अनिल धानोरकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने नमोजवार हे नाराज झाले होते. यामुळे त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला होता.

सुनील नामोजवार यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनिल धानोरकर हे काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचे भाचरे असून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे सख्खे मोठे बंधू आहेत. भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांची प्रतिष्ठा पणाला असून, त्यांनी नामोजवार यांना उमेदवारी देऊन भाजपला मोठा धक्का दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindu Wedding Rituals: लग्नानंतर गृहप्रवेशाच्या वेळी नववधू का तांदळाचं माप का ओलांडते?

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ६० आमदारांविरोधात काम केलं, तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट

Girija Oak in Laws Family: अभिनेत्री गिरिजा ओकचे सासू-सासरे कोण? काय करतात?

Cucumber Benefits Eyes: डोळ्यांवर काकडी का ठेवतात? उत्तर वाचून आश्चर्यचकित व्हाल

Pune Accident : पुण्यातील नवले ब्रिजवर पुन्हा अपघात, ४-५ वाहनांची जोरदार धडक

SCROLL FOR NEXT