Chandrapur BJP Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur BJP : भाजपमधील कलह चव्हाट्यावर; उमेदवाराला दोन माजी आमदारांचा विरोध

Chandrapur News : चंद्रपूरमधील भाजपचे माजी आमदार संजय धोटे आणि माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी आज राजुरा येथे माध्यमांपुढे येत आपली भूमिका मांडली.

संजय तुमराम

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपमधील अंतर्गत कलह पहिल्यांदाच जाहीरपणे उफाळून आला आहे. ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचे खंदे समर्थक देवराव भोंगळे यांना राजुरा विधानसभेची उमेदवारी दिल्यामुळे दोन माजी आमदारांसह शेकडो कार्यकर्त्यांनी उघडउघड बंडखोरीची भूमिका घेतली आहे. आता पुढील काळात हि भूमिका काय चित्र निर्माण करेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

चंद्रपूरमधील (Chandrapur) भाजपचे माजी आमदार संजय धोटे आणि माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी आज राजुरा येथे माध्यमांपुढे येत आपली भूमिका मांडली. (BJP) राजुरा क्षेत्राची उमेदवारी जाहीर झालेले देवराव भोंगळे हे स्थानिक नाहीत. त्यांचे कोणतेही कार्य या क्षेत्रात नाही. शिवाय लोकसभा निवडणुकीत निरीक्षक म्हणून त्यांनी केलेल्या चुकीच्या कामांमुळे पक्षाला या क्षेत्रात मोठा फटका सहन करावा लागला; असा गंभीर आरोप या माजी आमदारांनी केला. 

तर पक्षाच्या विरोधात जाऊन उमेदवार देऊ 

याशिवाय केवळ एका मोठ्या नेत्याचे समर्थक असल्याने स्थानिकांना डावलून बाहेरचे पार्सल स्थानिकांच्या माथी मारले गेल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. हे पार्सल माघारी न बोलावल्यास नाइलाजाने पक्षाच्या विरोधात जावून उमेदवार देवू आणि हे पार्सल पराभूत करू; अशी जहाल भूमिका माजी आमदारांनी मांडली. हीच भूमिका आम्ही वरिष्ठ नेत्यांना भेटून पटवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: जागांचा निर्णय होण्याआधीच अबू आझमी यांचं मविआसंदर्भात मोठ विधान

CM एकनाथ शिंदेंना भाजपचा धक्का? सत्ता आल्यास फडणवीस मुख्यमंत्री? वाचा स्पेशल रिपोर्ट

Congress Fourth List : अंधेरी पश्चिममधून काँग्रेसनं उमेदवार बदलला, काँग्रेसची चौथी यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी? जाणून घ्या

Maharashtra News Live Updates : काँग्रेसच्या चौथ्या यादीत 14 उमेदवारांची नावे जाहीर

Maharashtra Election: शिवसेनेची दुसरी यादी जाहीर; मिलिंद देवरा देणार आदित्य ठाकरेंना टक्कर, कोणाला मिळाली संधी? वाचा

SCROLL FOR NEXT