Chandrapur News
Chandrapur News  Saam TV
महाराष्ट्र

Chandrapur News : एका सेल्फीने घेतला दोन मित्रांचा जीव; चंद्रपुरातील खळबळजनक घटना

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : हातात स्मार्टफोन (Mobile) असला, तर सेल्फी घेण्याचा मोह आवरत नाही. मात्र, सेल्फी घेण्याच्या नांदात काहीजण आपल जीव गमावून बसतात. अशीच एक घटना चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात घडली. सेल्फीच्या नांदात दोन जीवलग मित्रांनी आपला जीव गमावला. तलावाजवळ सेल्फी घेत असताना एक मित्र पाण्यात पडला, त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने पाण्यात उडी घेतली मात्र दोघेही बुडाले. (Chandrapur Todays News)

अंगावर काटा आणणारी ही थरारक घटना वरोरा-चिमूर मार्गावरील चारगाव सिंचन तलाव परिसरात घडली. हार्दिक गुळघाने (वय 19) आणि आयुष चिडे (वय 19) अशी मृत्युमुखी पडलेल्या जीवलग मित्रांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, वरोरा-चिमूर मार्गावरील चारगाव सिंचन तलाव परिसरात ५ मित्र फिरण्यासाठी गेले होते.

सिंचन तलाव असलेल्या चारगावलगतच्या शेगाव येथील रहिवासी हार्दिक गुळघाने (19) सेल्फी काढण्यासाठी गेला असताना पाय घसरून तलावात पडला. त्याला वाचविण्यासाठी आयुष चिडे (19) सरसावला. मात्र तोही पाण्यात बुडाला. इतर मित्रांनी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत दोघेही पाण्यात बुडाले होते. (Chandrapur News Today)

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मासेमारांच्या सहाय्याने दोघांनाही शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. 2 तासांच्या प्रयत्नानंतर अखेर दोन्ही मृतदेह आढळून आले. शेगाव पोलीस ठाण्याच्या चमूने घटनास्थळी दाखल होत परिस्थिती हाताळली. दोन जीवलग मित्रांचा एकाचवेळी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvinder Singh Lovely : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; दिल्लीच्या माजी काँग्रेस अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Patra Chawl Scam: संजय राऊतांकडून माझा आणि कुटुंबीयांचा छळ', स्वप्ना पाटकर यांचा गंभीर आरोप

Jalna News | जालन्यात मराठा आंदोलक आक्रमक! भाजप कार्यकर्ते आंदोलकांमध्ये झटापट...

Urvashi Rautela: ऋषभ पंतशी लग्न करणार का? चाहत्याचा प्रश्न, दोन शब्दात उत्तर देत उर्वशी रौतेलानं चर्चा केली शांत

Bachchu Kadu Sangali Speech |"जात-धर्माशिवाय तुम्हाला निवडणुका जिंकता येत नाही", बच्चू कडू बरसले!

SCROLL FOR NEXT