Leopard Attack Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack : अंगणात खेळत असलेल्या चिमुकलीवर बिबट्याची झडप; मुलगी गंभीर जखमी

Chandrapur News : पाणीच्या शोधात ते वस्ती असलेल्या परिसराकडे जात असून यात पशु व मानवावर हल्ला करत असल्याच्या घटना देखील वाढल्या आहेत.

संजय तुमराम

चंद्रपूर : पाणी व शिकारीच्या शोधात बिबटे शहर वस्ती परिसरात येत आहेत. अशाच प्रकारे चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील बल्लारपूर शहराच्या सीमावर्ती भागात दीनदयाल वार्डात आलेल्या बिबट्याने (Leopard) अंगणात खेळत असलेल्या चिमुकलीवर हल्ला करत उचलून नेले. या हल्ल्यात सात वर्षीय बालिका गंभीर जखमी झाली आहे. (Latest Marathi News)

मागील काही दिवसांपासून शहर व गाव परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. शिकार व पाणीच्या शोधात ते वस्ती असलेल्या परिसराकडे जात असून यात पशु व मानवावर हल्ला करत असल्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. अशाच प्रकारे बल्लारपूर शहराच्या सीमावर्ती भागातील दीनदयाल वार्डात अंगणात खेळत असलेल्या साफिया इकबाल शेख या चिमुकलीला बिबट्याने अचानक हल्ला (Leopard Attack) करत उचलून नेले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोबत खेळत असलेल्या तिच्या बहिणीने घराकडे धूम ठोकून आपल्या काकांना ही माहिती सांगितली. काका अन्वर शेख यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला हुसकावून लावत त्याच्या तावडीतून साफियाला सोडविले. आधी बल्लारपूर रुग्णालय व नंतर आता चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. दीनदयाल वार्डातील बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डिझेलसाठी शेतकऱ्याला पाया पडण्याची वेळ; VIDEO व्हायरल

Chanakya Niti: एकटं राहूनही खुश असतात हे लोक, चाणक्यांनी सांगितली ५ कारणं

Maharashtra News Live Update: लातूरच्या RCC क्लासवर शिवसेनेकडून शाही आणि काळ ऑइल फेकलं

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! इडलीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी|VIDEO

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT