चंद्रपूर : विवाह सोहळा म्हटला म्हणजे अफाट खर्च. सर्व हौस मौज करत विवाह सोहळे होत असताना आता पाहण्यास मिळत आहेत. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील सुसा या गावात कमीतकमी खर्चाचा आदर्श असा सत्यशोधक विवाह सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या लग्नात खर्च टाळून त्या पैशात नवरदेवाने गावातील शिवार रस्ते बांधले. यासाठी दोन्ही पक्षाकडीन मंडळींचा सहभाग राहिला.
चंद्रपूर जिल्ह्यातील सुसा गावातील श्रीरंग एकुडे यांचा मुलगा श्रीकांत आणि यवतमाळातील मोझर या गावचे गोपीकिसन गरमडे यांची मुलगी अंजली यांचा विवाह वरोरा तालुक्यातील सुसा येथे पार पडला. नवरदेव असलेले श्रीकांत एकुडे परिसरातील प्रगतशील शेतकरी आहेत. सोबतच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम देखील ते राबवत असतात. लग्न करताना त्यांची लग्न सत्यशोधक पद्धतीने करण्याची एकच अट होती.
वधू पक्षाचीही सहमती
दरम्यान मुलगी अंजलीच्या वडिलांकडे श्रीकांत याने हा प्रस्ताव ठेवला. यावेळी वधू पक्षाकडील मंडळींनी निर्णय घ्यायला थोडा वेळ घेतला. शेवटी घरच्यांसोबत बोलून त्यांनी होकार कळवला. लग्नात कोणताही अधिकचा खर्च करायचा नाही. हेच पैसे सर्वांना उपयोगी अशा ठिकाणी वापरायचे, असा निर्णय दोन्ही कुटुंबानी घेतला आणि शिवार रस्ते बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
दोन शिवार रस्त्यांचे खडीकरण
पावसाळ्यात शिवार रस्त्यांची अवस्था फारच वाईट होते. शेतकऱ्यांना तर सोडा जनावरांनाही जाणे शक्य होत नाही. म्हणून श्रीकांतने लग्न खर्चातून बचत करत अतिशय अडचणीच्या असणाऱ्या दोन शिवार रस्त्याचे खडीकरण केले. यामुळे आता शिवारातील शेतकऱ्यांना पावसाळ्यात सुद्धा ये- जा करता येणार आहे.
नातेवाइकांकडूनही फळझाडांची भेट
श्रीकांतने सर्व नातेवाईकांना लग्न समारंभापूर्वी लग्नात भेट म्हणून फळझाडे देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आधीच आवाहन केल्यानुसार नातेवाईक आणि मित्रांनी लग्नानिमित्त जोडप्याला झाडांचा आहेर दिला. नातेवाईक आणि मित्रांनी प्रतिसाद देत तब्बल ९० पेक्षा जास्त फळझाडे भेट दिली, त्याची लागवड करून आता मोठी फळबाग तयार होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.