Chandrapur News Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातून दोन वाघिणी पाठवणार ओडिशाच्या जंगलात; सिमलीपल व्याघ्र प्रकल्पात सोडणार

Chandrapur News : ओडिशातील सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पात वाघिणींची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे ओडिशा राज्य सरकारने प्रजनन आणि ओघानेच वाघांच्या वाढीसाठी वाघिणींची गरज NTCA कडे नोंदवली

संजय तुमराम

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वाघिणी ओडिशाच्या जंगलात पाठविण्यात येणार आहेत. यासाठी अडीच ते तीन वर्षे वयाच्या दोन वाघिणींचा शोध सुरु असून वाघिणी सापडल्यानंतर त्या ओडिशाला रवाना केल्या जातील. यानंतर सिमलीपल व्याघ्र प्रकल्पात सोडल्या जाणार आहेत. 

ओडिशातील (Odisa) सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पात वाघिणींची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे ओडिशा राज्य सरकारने प्रजनन आणि ओघानेच वाघांच्या वाढीसाठी वाघिणींची गरज NTCA कडे नोंदवली. त्यानुसार ही गरज आता चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातून भागवली जाणार आहे. त्यासाठी अडीच ते तीन वर्षे वयाच्या वाघिणींचा शोध घेतला जात आहे. दोन वाघिणी पाठवायच्या असल्या तरी शोध अनेक वाघिणींचा घेतला जात आहे. ताडोबा कोअर, बफर आणि संरक्षित जंगलात हा शोध सुरू आहे. अजूनपर्यंत अशा वाघिणी सापडलेल्या नाहीत. 

या वाघिणी ज्यावेळी पकडल्या जातील; तेव्हा लगेच त्या ओडिशाला रवाना केल्या जाणार आहेत. यापूर्वीही अशा रीतीने इथले वाघ राज्यात इतरत्र पाठवण्यात आले आहेत. पण ते वाघ प्रामुख्याने हल्लेखोर होते. यावेळी मात्र इथे रमलेल्या वाघिणी पकडायच्या असून ओडिशासारख्या दूरवरच्या राज्यात सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे ओडिशा वन विभागाची जबाबदारी मोठी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT