Chandrapur DCC Bank Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur DCC Bank : चंद्रपूर जिल्हा बँकेतून सायबर गुन्हेगारांनी मारला डल्ला; ३ कोटी ७० लाख रुपये लांबवले

Chandrapur News : जिल्हा बँकेतून रक्कम ट्रान्सफर करत डल्ला मारल्याचा प्रकार चंद्रपूर जिल्हा बँकेत समोर आला या प्रकाराबाबत कोणाला काही समजण्याच्या आत तब्बल पावणेचार लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत

संजय तुमराम

चंद्रपूर : सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळे आमिष दाखवत अनेकांची फसवणुक केल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र या सायबर गुन्हेगारांनी आता थेट चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतच डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चंद्रपूर जिल्हा बँकेतुन या सायबर चोरट्यानी तब्बल ३ कोटी ७० लाख रुपये लांबवीले आहेत. या प्रकारामुळे जिल्हा बँकेत खळबळ उडाली आहे. 

सायबर गुन्हेगार थेट खात्यातून रक्कम ट्रान्सफर करत समोरच्याचे बँक खाते खाली करत असतात. यामध्ये काही जणांना वेगवेगळे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे प्रकार घडत असतात. मात्र थेट जिल्हा बँकेतून रक्कम ट्रान्सफर करत डल्ला मारल्याचा प्रकार चंद्रपूर जिल्हा बँकेत समोर आला आहे. या प्रकाराबाबत कोणाला काही समजण्याच्या आत तब्बल पावणेचार लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. 

३४ जणांच्या खात्यातून रक्कम आरटीजीएस 

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून RTGS केलेली रक्कम नागपूर येथील येस बँकेच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीच्या खात्यात जमा होते. दरम्यान ७ आणि १० फेब्रुवारी या दोन दिवसात ३४ खातेदारांच्या खात्यामधून ही रक्कम RTGS करण्यात आली. सायबर गुन्हेगारांकडून ७ आणि १० फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलेले अनेक ट्रांजेक्शन करत दिल्ली आणि नोएडा येथील खात्यांवर वळते करत हा डल्ला मारला आहे.  

अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल 

या प्रकरणात जिल्हा मध्यवर्ती बँक "मेकर आणि चेकर" आहे. तर येस बँक हि बेनिफिशरी बँक आहे. मात्र आरटीजीएस केलेली रक्कम संबंधित खात्यांमध्ये जमा न झाल्याने संशय या व्यवहाराचा संशय आला. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा बँकेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चंद्रपूर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी घटनेची चौकशी करण्यासाठी तज्ञांचे एक पथक बोलावल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT