Chandrapur News Saam TV
महाराष्ट्र

Chandrapur News : परीक्षेच्या पहिल्याच दिवशी बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; नोटबुकवर सॉरी लिहिलं अन्...

12th student ended life: सदर घटना चंद्रपूर शहरातील सुमित्रनगर भागात घडलीये.अनिशा खरतड (19) असे विद्यार्थिनीचे नाव आहे. आजोबांच्या मालकीच्या रिकाम्या फ्लॅटवर अनिशा नियमितपणे अभ्यासासाठी जात होती.

Ruchika Jadhav

संजय तुमराम

Chandrapur Crime :

आजपासून राज्यात बारावीच्या परीक्षांना सुरूवात झाली आहे. परीक्षेचा पहिलाच दिवस असताना एक धक्कदायक घटना समोर आलीये. परीक्षा पुढ्यात असताना चंद्रपुरात बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सदर घटना चंद्रपूर शहरातील सुमित्रनगर भागात घडलीये.अनिशा खरतड (19) असे विद्यार्थिनीचे नाव आहे. आजोबांच्या मालकीच्या रिकाम्या फ्लॅटवर अनिशा नियमितपणे अभ्यासासाठी जात होती.

काल देखील ती येथे गेली मात्र बराचवेळ झाला तरी ती घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या आईबाबांची काळजी वाढू लागली. अनिशा परत न आल्याने आईवडिलांनी फ्लॅटवर चक्कर मारली. त्यावेळी समोर दिसलेलं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

अनिशाने पंख्याला गळफास घेतला होता. त्याच अवस्थेत तिला पाहून आई-वडिलांवर दुख्खाचा डोंगर कोसळला. आईच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूच्या सर्व व्यक्ती तेथे धावून आले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस तपासात मयत विद्यार्थिनीच्या नोटबुकवर सॉरी असे लिहिलेले आढळले आहे. पोलिसांनी विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांची चौकशी केली. त्यावेळी ती अभ्यासात हुशार होती, असं कुटुंबीयांनी सांगितलं. मात्र तिच्यावर परिक्षेचा भरपूर तान होता. चांगले गुण मिळवण्यासाठी ती मेहनत करत होती. मात्र परीक्षेच्या तणावात होती. या तणावामुळेच विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांच्या निवासस्थानी मोठा जल्लोष

Eknath Shinde News : हा विजय न भूतो न भविष्यति आहे, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया | VIDEO

Naresh Mhaske: महायुतीचा हा एकतर्फी विजय आहे, नरेश म्हस्के यांनी दिली प्रतिक्रिया| Video

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

SCROLL FOR NEXT