Congress leaders celebrate after securing a massive victory in Chandrapur district municipal elections. saam tv
महाराष्ट्र

Chandrapur Election: पाच आमदार असूनही चंद्रपुरात भाजप फेल; काँग्रेसचा दणदणीत विजय

Chandrapur Nagar Palika And Nagar Parishad Election Results : चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवलाय. ११ पैकी ७ नगरपरिषदा जिंकल्या. येथे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार हे किंगमेकर ठरलेत.

Bharat Jadhav

  • चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांत काँग्रेसचा दणदणीत विजय.

  • ११ पैकी ७ नगरपरिषदांवर काँग्रेसची सत्ता.

  • भाजपचे पाच आमदार असूनही जिल्ह्यात भाजपला मोठा पराभव.

आज चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण १० नगरपरिषद व १ नगरपंचायतीचा निकाल जाहीर करण्यात आला. जिल्ह्यात पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव करत जिल्ह्यात ११ पैकी ७ नगरपरिषदांवर विजय संपादन केला. काँग्रेसच्या या मोठ्या यशात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार हे किंगमेकर ठरले असून चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपच्या पाच आमदारांच्या मतदारसंघात काँग्रेसने मात दिली.

नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निकालात विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी मतदारसंघातील नगरपरिषदेत काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. ब्रह्मपुरी नगरपरिषदेवर काँग्रेसचे नगराध्यक्ष योगेश मिसार यांच्यासह २१ नगरसेवक विजयी झाले. तर भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार, चिमूर आमदार कीर्तीकुमार भांगडिया, चंद्रपूर आमदारकिशोर जोरगेवार, वरोरा आ.करण देवतळे यांच्या गडाला सुरुंग लावत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली लढविलेल्या बल्लारपूर, मूल, नागभीड , घुग्गुस, वरोरा, राजुरा नगरपरिषदेत काँग्रेसने सत्ता खेचून आणली.

चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मिळालेलं यश हे भाजप सरकारच्या विरोधातील जनमत आहे. महायुती सरकारची जनविरोधी धोरणे, शेतकऱ्यांची होत असणारी गळचेपी, लोकशाही तुडवून लादले जाणारे निर्णय याविरोधात जनतेने कौल दिल्याचे काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले.आजचा विजय हा कोणत्या एका नेत्याचा नसून पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने केलेली मेहनत, नेत्यांनी केलेले मार्गदर्शन आणि संघटनेची ताकद यामुळे चंद्रपुरात काँग्रेसचा तिरंगा फडकला अस वडेट्टीवार म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने नागपूर विभागाची जबाबदारी विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना दिली होती. पक्षाने दिलेली जबाबदारीवर पार पाडत चंद्रपूर जिल्ह्यात वडेट्टीवार यांनी पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले. वडेट्टीवार यांच्या साथीला चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, जिल्ह्यातील काँग्रेसचे स्थानिक नेते व पदाधिकारी यांनी भाजपा आमदारांच्या मतदारसंघात जाऊन किल्ला लढवला. वडेट्टीवार यांनी केलेल्या नियोजनामुळे जिल्ह्यात भाजपचा धुव्वा उडाला.

आज नगरपालिका निवडणुकीत यश मिळाले तरी ही परिवर्तनाची नांदी आहे. येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्ष अजून जोमाने काम करणार, जनतेपर्यंत आपले काम पोहोचवणार असे वडेट्टीवार म्हणाले.आज काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरामध्ये गुलाल उधळत,फटाक्यांची आतषबाजी करत सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मतदारांचा घराणेशाहीला सुरुंग; एका घरातले 6 उमेदवार, सहाही पडले

शिंदेसेनेच्या मंडलिकांना मोठा धक्का; दोन्ही राष्ट्रवादीनं राखला कागलचा गड, VIDEO

ठाकरे गटाचा बालेकिल्ला ढासळला; कोकणात चालली शिंदेंची जादू, निकाल बदलणार कोकणाचं गणित?

कणकवलीत मंत्री राणेंचा पराभव; भावांच्या भांडणात संदेश पारकर नगराध्यक्ष

Nagar Palika Nagar Parishad Election: स्वबळावर लढले, जागा वाढल्या; उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंचं यश पाचपट

SCROLL FOR NEXT