chandrapur mahanagar palika saam tv
महाराष्ट्र

Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूरातील कच-याच्या प्रश्नावरुन पटेल हायस्कूल चौकात तणाव, आंदाेलक कर्मचारी भूमिकेवर ठाम

अद्याप कुठलाही तोडगा निघाला नसल्याने कर्मचारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

संजय तुमराम

Chandrapur News : ऐन सण -सोहळे यांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरात कचरा कोंडी बघायला मिळत आहे. गेले 4 दिवस चंद्रपूर शहर मनपाचे कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत. कचरा संकलन करणारे कर्मचारी व चालक संपावर गेल्याने शहरातील कचरा संकलन ठप्प झाले आहे. (Maharashtra News)

चंद्रपूर शहरात 15 -16 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र अनुवप्रर्तन महोत्सव आहे. यानिमित्त शहरात येणाऱ्या लाखो आंबेडकरी अनुयायांसाठी स्वच्छता महत्वाची समस्या ठरणार आहे. किमान वेतन आणि मागील कंत्राटदाराची थकीत देणी या विषयावर कंत्राटी सफाई कर्मचारी संपावर गेले आहेत.

गेले कित्येक महिने हे कर्मचारी आपल्या मागण्यासंदर्भात मनपा प्रशासनासोबत पाठपुरावा करत होते. यात कुठलाही तोडगा निघाला नाही. आज संपकरी कर्मचाऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी मनपाने नियुक्त केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना आंदोलकांनी काम करण्यापासून रोखले.

यामुळे स्थानिक पटेल हायस्कूल समोरील चौकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महापालिकेकडे चंद्रपूर शहरातील विविध भागात तुंबलेला कचरा प्रश्न सोडविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Metro Job: दिल्ली मेट्रोत मॅनेजर होण्याची संधी; महिना ८७००० रुपये पगार, पात्रता काय? जाणून घ्या

Ice cream ला संस्कृतमध्ये काय म्हणतात? तुम्हाला माहितेय का?

Viral Video: हे प्रभु ! एक्सीलेटरवरुन येण्याची नवीन पद्दत, VIDEO पाहून पोट धरुन हसाल

Viral Video: नातवासाठी काहीपण! चिमुकल्याला हसवण्यासाठी आजोबांचा डान्स; पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: बुलडाण्यात पोलिस व्हॅन आणि पिकअपची समोरासमोर धडक, २ पोलिसांसह तिघे गंभीर

SCROLL FOR NEXT