Siddhi Hande
रोज चहासोबत नाश्त्याला काय बनवावं असा प३श्न अनेकांना पडलेला असतो.
तुम्ही घरीच झटपट बनणारा टेस्टी पावभाजी खाकरा बनवू शकतात. या खाकऱ्याला पावभाजीची टेस्ट असेल.
गव्हाचे पीठ, बेसन, लसूण, हिरवी मिरची पेस्ट, हळद, लाल तिखट, पावभाजी मसाला, मीठ
सर्वात आधी तुम्हाला गव्हाचे पीठ, बेसन एकत्र करायचा आहे. यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाका.
यानंतर खाकऱ्यात हिरव्या मिरचीची पेस्ट, हळद, लाल तिखट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावभाजी मसाला टाकायचा आहे.
या मिश्रणात आवश्यकतेनुसार मीठ टाका. त्यानंतर पीठात पाणी टाकून ते मळून घ्या. पीठ जास्त पातळ नसावे.
यानंतर पीठाचे गोळे बनवून घ्या. हे गोळे पातळ पोळीसारखे लाटून घ्या.
यानंतर तव्यावर तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या.