Shreya Maskar
लसणाची कढी बनवण्यासाठी लसूण, बेसन, मेथी दाणे, दही, आले, हिरवी मिरची, कोथिंबीर, लवंग, तमालपत्र, हिंग, जिरे आणि कढीपत्ता इत्यादी साहित्य लागते.
लसणाची कढी बनवण्यासाठी सर्वप्रथम लसूण, आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
एका बाउलमध्ये बेसन, दही मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा. पेस्ट जास्त घट्ट आणि जास्त पातळ होणार नाही, याची काळजी घ्या.
पॅनमध्ये बेसनची पेस्ट टाका. त्यानंतर त्यात मेथी दाणे १० मिनिटे उकळा. कढी सतत ढवळत राहा.
दुसरा पॅन गरम करा त्यात देशी तूप आणि लसूणचे वाटण टाकून चांगले परतून घ्या. तुम्ही यात तुमच्या आवडीचे मसाले टाका.
गरम तुपात लवंगा, तमालपत्र, हिंग, जिरे, लाल मिरच्या, कढीपत्ता आणि लसूण इत्यादी खडे मसाले टाकून तळून घ्या.
आता यात बेसन-मेथीची पेस्ट, मीठ आणि साखर घालून मिक्स करा. कढी जास्त पातळ आणि जास्त घट्ट करू नका. चांगली ४-५ मिनिटे उकळी काढून घ्या.
गरमागरम लसणाच्या कढीचा भातासोबत आस्वाद घ्या. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे. तसेच पौष्टिक देखील आहे.