Diwali Gift Dispute Turns Fatal in Chandrapur Saam Tv
महाराष्ट्र

दिवाळी गिफ्टसाठी हट्ट, मालकाकडून शिवीगाळ करत अमानुष मारहाण, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Diwali Gift Dispute Turns Fatal in Chandrapur: दिवाळीचे गिफ्ट मागण्याच्या वादातून सहा जणांनी मिळून एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणाचा अवघ्या तासाभरात स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावत सहा जणांना अटक केली.

Bhagyashree Kamble

  • दिवाळी गिफ्टच्या वादातून चंद्रपुरात हत्या

  • सहा आरोपींना तासभरात अटक

  • चंद्रपूर शहरातील लॉ कॉलेज परिसरातील घटना

चंद्रपूरमधून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. दिवाळी गिफ्ट मागण्यावरून झालेल्या वादातून सहा जणांनी मिळून एका तरूणाची निर्दयतेने हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. अवघ्या तासाभरात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपीला ताब्यात घेतलं. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

नीतेश ठाकरे (वय वर्ष २७) असे मृत तरूणाचे नाव आहे. तो दुर्गापूर परिसरात सुजित गणवीर याच्या पानटपरीवर काम करीत होता. दिवाळीच्या निमित्ताने भेटवस्तू (गिफ्ट) देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. तो मालकाकडे वारंवार गिफ्टची मागणी करीत होता. या मागणीसह तरूण शिवीगाळ करत असल्याची माहिती समोर आली आहे.

नीतेश वारंवार सुजित त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून सुजितने नीतेशची हत्या करण्याचा निर्णय घेतला. सुजित गणवीरने आपल्या साथीदारांच्या मदतीने नीतेशची विधी महाविद्यालय (लॉ कॉलेज) परिसरात हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला.

मात्र, घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तसेच केवळ एका तासात सर्व आरोपींना ताब्यात घेतलं. करण मेश्राम (२२), यश छोटेलाल राऊत (१९), अनिल रामेश्वर बोंडे (२२), प्रतीक माणिक मेश्राम (२२), तौसीफ शेख (२३) आणि सुजित गणवीर (२५) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूर महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार

Horoscope benefits: आजच्या दिवशी कुणाला मिळणार लाभ? पाहा २९ डिसेंबरचं पंचांग आणि राशीभविष्य

Pune Politics: पुण्यात काँग्रेस-शिवसेना अन् मनसे एकत्र निवडणूक लढवणार, जागा वाटपाचा तिढा सुटला; आज होणार घोषणा

Januray 2026 Gochar: जानेवारीत मकरसह ३ राशी होणार मालामाल; 4 ग्रह करणार त्यांच्या राशीत बदल

Success Story: सलग १० वेळा नापास, आईचे दागिने गहाण ठेवले; जिद्दीने क्रॅक केली UPSC; सिद्धार्थ सक्सेना यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT