Water Supply , Chandrapur, chandrapur mahanagar palika saam tv
महाराष्ट्र

Chandrapur News : दहा माजी नगरसेवकांनी चंद्रपूर मनपा प्रशासनास दिला 48 तासांचा अल्टिमेटम

यापुर्वी मनपाला सुद्धा आर्थिक तोटा झाला हाेता.

संजय तुमराम

Chandrapur News : चंद्रपूर शहर महानगरपालिकेची पाणीपुरवठा योजना चालविण्यासाठी तसेच देखभाल दुरुस्तीसाठी कंत्राटदार नेमण्याच्या हेतूने नुकतीच एक ऑनलाईन निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यास माजी नगरसेवकांनी विराेधी दर्शविला आहे. (Maharashtra News)

पाणीपुरवठा योजनेच्या खाजगीकरणाचा घाट मनपा प्रशासनाने घातलेला असून, प्रस्तावित खाजगीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी मनपातील 10 माजी नगरसेवकांनी मनपा प्रशासनाला 48 तासांचा लेखी अल्टिमेटम निवेदनाद्वारे दिला आहे. 21 जूनपर्यंत प्रस्तावित खाजगीकरण मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा या नगरसेवकांनी दिला.

मनपाच्या पाणीपुरवठा योजनेची यंत्रसामुग्री-उपकरणे चालवण्यासाठी व देखभाल -दुरुस्तीसाठी मनपाने निविदा प्रसिद्ध केली. मात्र यापूर्वी पाणीपुरवठा योजनेतील ही सर्व कामे करण्यासाठी एका एजन्सीला काम देण्यात आले होते. पाणीपुरवठा योजनेमध्ये या कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे चंद्रपूर शहरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. तसेच मनपाला सुद्धा आर्थिक तोटा झाला.

यानंतर मनपाच्या आमसभेत सर्वानुमते पाणीपुरवठ्याचे कंत्राट रद्द करून मनपातर्फे पाणीपुरवठा योजना चालवण्याचा ठराव घेण्यात आला. ही यंत्रणा चालवण्यासाठी लागणारे तांत्रिक मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आले. मागील दोन वर्षांपासून मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली पाणीपुरवठा योजना चालविण्यात येत आहे.

मात्र आता अचानक या संपूर्ण योजनेसाठी एकाच कंत्राटदाराची नियुक्ती करण्याच्या  हेतूने मनपा प्रशासनाने निविदा प्रसिद्ध केली. यापूर्वी चंद्रपूर शहरातील सुमारे चार लक्ष नागरिकांच्या वतीने मनपाच्या आमसभेत तत्कालीन नगरसेवकांनी खाजगीकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यामुळे मनपाची नवीन महासभा अस्तित्वात येईपर्यंत जुन्या आमसभेने घेतलेल्या निर्णयाचा मनपा प्रशासनाने आदर राखणे आवश्यक असल्यामुळे माजी नगरसेवकांनी प्रस्तावित खाजगीकरणाला विरोध केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टिटवाळ्यात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत गोंधळ, 70 ते 80 जणांविरोधात गुन्हा

Matcha Tea : सकाळी की संध्याकाळी? माचा चहा पिण्याची योग्य वेळ कोणती?

Monday Horoscope : चांदीच चांदी होणार! या 5 राशींना मिळणार नशिबाची साथ, पैशांचा मार्ग होणार मोकळा; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Kalyan Crime: माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर...; कल्याणमध्ये 'मज्जू' भाईची दहशत, व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला अन्...

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी चोरी; १२ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने लंपास|VIDEO

SCROLL FOR NEXT