Chandrapur: Farmer consumes poison in tehsil office after 2-year land mutation delay saam tv
महाराष्ट्र

Chandrapur Farmer: शेतीच्या फेरफारासाठी 2 वर्षे टाळाटाळ; तहसील कार्यालयातच शेतकऱ्यानं घेतला टोकाचा निर्णय

Chandrapur Farmer Dies After Consuming Poison: चंद्रपूर येथील एका शेतकऱ्याने जमिनीच्या नोंदीतील फेरफारात २ वर्षांचा विलंब झाल्यानंतर भद्रावती तहसील कार्यालयात विष प्राशन केले. उपचारादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू झालाय.

Bharat Jadhav

  • भद्रावती तहसील कार्यालयात शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

  • दोन वर्षं जमिनीच्या फेरफारासाठी टाळाटाळ केली जात असल्याने विष प्राशन केलं.

  • परमेश्वर मेश्राम असं शेतकऱ्याचे नाव आहे.

प्रशासनाच्या मुजोरीपणाचा आणि कामासाठी गरीब शेतकऱ्यां येरझऱ्या मारायला भाग पाडणाऱ्या अधिकाऱ्यामुळे एका शेतकऱ्यानं आपलं आयुष्य संपवलं. चंद्रपुरातील भद्रावती तहसील कार्यालयात विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न अधिकाऱ्याच्या मुजोरीला वैतागलेल्या शेतकऱ्याने केला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांचा मृत्यू झालाय.

परमेश्वर मेश्राम असे शेतकऱ्याचे नाव आहे. जमिनीचा फेरफार नोंद करण्यास तहसील कार्यालयातून सातत्याने टाळाटाळ होत असल्याने मेश्राम यांनी 26 सप्टेंबरला तहसील कार्यालयात विष प्राशन केलं. त्यानंतर तेथील काही नागरिकांनी मेश्राम यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भरती केलं. मात्र अखेर 10 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.

परमेश्वर मेश्राम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय. जमिनीचा फेरफार जोपर्यंत आमच्या नावावर होत नाही. शेतीचा ताबा मिळत नाही तोपर्यंत मृतदेह घेणार नाही अशी कुटुंबीयांची भूमिका घेतलीय. दरम्यान परमेश्वर मेश्राम यांची वडिलोपार्जित 8.5 एकर जमीन आहे. या जमिनीबाबत कोर्टात केस सुरू होती.

या केसचा निकाल मेश्राम यांच्या बाजूने लागला. पण तरीही गेल्या दोन वर्षांपासून तहसील कार्यालयातून त्यांच्या नावे फेरफार करण्यास टाळाटाळ केली जात होती. या प्रकरणी भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray : ...अन् तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगार ३०,००० रुपये; आजच करा अर्ज

Jio Special Offer: जिओचा डबल धमाका! एका प्लॅनसोबत दुसरा प्लॅन फ्री, काय आहे ऑफर जाणून घ्या

Maharashtra Live News Update: नगरपरिषद आणि नगरपंचायत आचारसंहिता घोषित झाल्यानंतर आशिष शेलार मुंबईच्या दिशेने रवाना

रायगडनंतर नंदुरबारमध्येही महायुतीत राडा; शिवसेना-भाजपात तेढ,भाजप आमदाराला सेनेशी युती आवडेना

SCROLL FOR NEXT