Chandrapur Crime Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur Crime : चंद्रपूर हादरले; पायी जाणाऱ्या युवतीला लिफ्ट दिली, शेतात नेत केला सामूहिक अत्याचार

Crime News Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी हि घटना समोर आली आहे. या घटनेत एका १९ वर्षीय तरुणीवर तिघांनी मिळून शेतात नेऊन सामूहिकरीत्या लैंगिक अत्याचार केला

संजय तुमराम

चंद्रपुर : महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना अजूनही थांबलेल्या नाहीत. एकट्या महिला, मुलीला पाहून तिची छेळ काढणे किंवा तिच्यावर अत्याचाराच्या घटना सातत्याने होत आहे. अशीच एक घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली असून रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने शेतात नेत तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. या घटनेने चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी हि घटना समोर आली आहे. या घटनेत एका १९ वर्षीय तरुणीवर तिघांनी मिळून शेतात नेऊन सामूहिकरीत्या लैंगिक अत्याचार केला. दरम्यान पीडित तरुणी आपल्या आजीच्या घरी पायी चालत जात होती. यावेळी युवतीसोबत ओळख असलेल्या प्रतीक साटोने (वय २६) याने तिला दुचाकीवर बसवून घरी सोडण्याचे सांगत लिफ्ट दिली. मात्र त्याने तिला घरी न नेता शेतात घेऊन गेला. 

दोन साथीदारांना बोलावून घेत केला अत्याचार 

सदर युवतीला शेतात घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने आपल्या दोन साथीदारांना बोलावून घेतले. यात विकी साटोने (वय २९) आणि अंकित काकडे (वय ३१) यांना बोलावून तिघांनी मिळून सामूहिक अत्याचार केला. सदरची घटना एप्रिल महिन्यात घडली असून बदनामीच्या भीतीने पीडितेने आतापर्यंत कोणालाही काही सांगितले नव्हते. अखेर महिनाभरानंतर हि घटना समोर आली आहे.  

दोघेजण ताब्यात, एक फरार 

मात्र पीडित युवतीने अखेर धाडस करून पोलीस ठाण्यात जात घडल्या प्रकारची पोलिसांनी माहिती देत तक्रार दाखल केली. यानंतर चिमूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत प्रतीक आणि विकीला अटक केली असून अंकित सध्या फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत असून घटनेचा तपास पोलीस करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विलास घुले मृत्यू प्रकरण तापलं! खासदाराच्या मुलाला अटक करा नाहीतर...; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण

'गुंगी गुडिया'ला धनंजय मुंडेच जबाबदार? सुनील तटकरेंनी मुंडेंचे कान टोचले

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात? इतर 3 मंत्र्यांवरही टांगती तलवार? मोठी खळबळ

राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर बंदी, ग्राहकांची कृत्रिम पनीरपासून सुटका

SCROLL FOR NEXT