Chandrapur News Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur News: अनैतिक संबंधाचा संशय; पत्नीच्या कथित प्रियकरावर भरचौकात चाकू हल्ला

अनैतिक संबंधाचा संशय; पत्नीच्या कथित प्रियकरावर भरचौकात चाकू हल्ला

संजय तुमराम

चंद्रपूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत कथीत प्रियकरावर पतीने चाकू हल्ला केल्याची घटना चंद्रपूर (Chandrapur News) जिल्ह्यातील गडचांदूर इथे घडली. यात कथित प्रियकर दिनेश महादेव काळे (वय ३६) हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (Breaking Marathi News)

गडचांदूर शहरातील मुख्य मार्गावर हा हल्ला (Crime News) करण्यात आला. हल्ला करणाऱ्या आरोपी पतीचे नाव भास्कर असे आहे. महात्मा गांधी विद्यालयाच्या समोर भास्कर याने दिनेशला जीवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण दिनेश त्याच्या तावडीतून कसाबसा सुटला. या झटापटीत तो जखमी झाला.

वाद होत असल्‍याने पत्‍नी रहायची दुसरीकडे

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी भास्कर यास ताब्यात घेतले. भास्करचे पत्नीशी पटत नसल्याने ती जवळच्याच बीबी या गावात दिनेश काळे याच्या घरी राहायची. या दोघांच्यात अनैतिक संबंध असल्याची शंका भास्करला आल्याने त्याने हा हल्ला केल्याचे सांगितले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC Card: एसटी प्रवाशांना दिलासा, NCMC कार्डच्या प्रक्रियेत मोठा बदल

Political News: मोठी बातमी! उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा, वसंत डावखरे प्रकरणात १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

Maharashtra News Live Update: गणेश विसर्जनासाठी पुणे पोलिसाचा चोख बंदोबस्त

Food For Weight Loss: पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात समावेश करा हे ७ पदार्थ; वजन होईल झपाट्याने कमी

Placenta percreta: मूत्राशयापर्यंत पोहोचली होती प्लॅसेंटा; प्रसूतीपूर्वीच धोका ओळखला, डॉक्टरांच्या मेहनतीने गर्भवती महिलेवर यशस्वी उपचार

SCROLL FOR NEXT