Congress-BJP Rada : राज्यभरात प्रचाराच्या तोफा थंडावल्या, आता मतदानातून जनता आपला कौल देणार आहे. सोमवारी दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभांचा आखाडा तापला होता. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. प्रचाराच्या तोफा शांत झाल्यानंतर राज्यातील वातावरण तापलेय. पालघर, नाशिक, नागपूर, कल्याणसह चंद्रपूरमध्येही जोरदार राडा पाहायला मिळाला. चंद्रपूरमध्ये सोमवारी रात्री काँग्रस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. हाणामारी अन् खुर्च्या फेकाफेकी झाल्याचं व्हिडीओतून दिसत आहे. चंद्रपूरमधील कोसंबी येथे हा राडा झाला.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात कोसंबी येथे सोमवारी रात्री भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला. प्रचाराची सांगता झाल्यानंतरही रात्री बारा वाजताच्या सुमारास कोसंबी येथे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे सभा घेत असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. वेळ संपल्यानंतरही सुधीर मुनगंटीवार सभा घेत असल्याचं समजल्यानंतर उमेदवार संतोष रावत काँग्रेस कार्यकर्त्यांसह तातडीने कोसंबीमध्ये पोहचले. त्यांनी सभा थांबवण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही गटात हाणामारी झाली. त्यावेळी मुनगंटीवार उपस्थित होते की, नाही याबाबत संभ्रम आहे.
रिपोर्ट्सनुसार, सुधीर मुनगंटीवार आणि रावत यांच्यामध्ये सभेच्या ठिकाणी शाब्दिक चकमक झाली. व्हिडीओ काढणाऱ्या रावत यांच्या चालकाला मारहाण झाल्याचाही काँग्रेसकडून आरोप करण्यात येत आहे. मारहाण केली जात असताना सोडवण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या विजय यांनाही मारहाण करण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी खुर्च्या फेकल्या. हा राडा होताच मुनगंटीवार निघून गेल्याचा काँग्रेसने आरोप केला. काँग्रेस उमेदवार संतोष रावत यांनी आचारसंहिता भंग आणि कार्यकर्त्यांना मारहाण प्रकरणी मुनगंटीवार यांच्यावर गुन्हा दाखल करावा, यासाठी कार्यकर्त्यांसह मूल पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत प्रदर्शन केले. दरम्यान, याप्रकरणी अजून गुन्हा दाखल झालेला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.