chandrakant patil should be removed from chair person of reservation committee Thackeray group demands all party meeting Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: चंद्रकांत पाटलांना हटवा अन् अजितदादांना अध्यक्ष करा; मराठा आरक्षणाच्या बैठकीत नेत्यांचा सूर

Maharashtra Politics: सर्वपक्षीय बैठकीत समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकात पाटलांऐवजी अजित पवार (Ajit Pawar) यांना अध्यक्ष करावं, अशी मागणी देखील यावेळी अनेक नेत्यांकडून करण्यात आली.

Satish Daud

Maharashtra Politics Latest News: मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राबाबत सखोल चर्चा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीला अनेक महत्वाचे नेते अनुपस्थित राहिले. महत्त्वाची बाब म्हणजे मराठा आरक्षणासाठी गठीत करण्यात आलेल्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीच बैठकीसाठी उपस्थिती नव्हती.  (Latest Marathi News)

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या अनुपस्थितीमुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमधील मराठा नेत्यांमध्ये नाराजीचे सूर दिसून आला. सर्वपक्षीय बैठकीत मंत्रीमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील समितीचे अध्यक्ष असतानाही ते बैठकीला का उपस्थित नाहीत? असा सवाल करत ठाकरे गटातील नेत्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं.

चंद्रकांत पाटील सकारात्मक नाहीत, त्यामुळे त्यांना बदलावं, अशी मागणी अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी बैठकीत केली. सर्वपक्षीय बैठकीत समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकात पाटलांऐवजी अजित पवार (Ajit Pawar) यांना अध्यक्ष करावं, अशी मागणी देखील यावेळी अनेक नेत्यांकडून करण्यात आली.

सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृहात पुन्हा बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदावरून चंद्रकांत पाटलांचा पत्ता कट करून अजित पवारांना संधी दिली जाणार का? अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

दरम्यान, जालन्यासह राज्यभरात मराठा आंदोलनामध्ये जे काही गुन्हे नोंद झाले आहेत ते मागे घेण्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. याशिवाय आंदोलकांवर लाठीमार केल्याप्रकरणी ३ पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन देखील करण्यात आलं. मराठा आरक्षणासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत, त्यामुळे जरांगे यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा आणि आंदोलन मागे घ्यावं, असा ठराव सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT