Chandrakant Patil Saam TV
महाराष्ट्र

आम्ही निवडणूक कशी लढतो तुम्हाला माहितेय, पंढरपूरची पुनरावृत्ती कोल्हापुरात होणार - चंद्रकांत पाटील

सतेज पाटील यांनी कोल्हापूर टोलची पावती फाडली, पण आम्ही कंत्राटदाराला पैसे देऊ कायमचा टोल घालवला. कोल्हापूर विमानतळाची काय अवस्था होती? स्वतःच विमान घेऊन येता येत नव्हती.

संभाजी थोरात, कोल्हापूर

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष आहे. आज कॉग्रेस आणि भाजपा या दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाषण करताना आघाडी सरकारवर निशाना साधत सतेज पाटलांनी आव्हान दिलं आहे. ते म्हणाले, काश्मीर भारतात राहण्याबाबत जो अडसर होतो तो नाहीसा झाला आहे. 370 कलम रद्द करणं आवश्यक होतं, ते नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) केलं. बिंदू चौकात स्टेज बनवतो, सतेज पाटील (Satej Patil) यांनी समोर यावं 50 वर्षात काँग्रेसनं काय केलं ते मांडावं, आम्ही 7 वर्षात काय केलं ते सांगतो. महाराष्ट्रातील 5 वर्षाची यादी आम्ही देतो, तुम्ही 50 वर्षाची यादी द्या.

1 लाख 76 कोटींचे मेट्रोचे काम आम्ही राज्यात आणलं कोल्हापूर महापालिका एकदा द्या, पुण्यासारखी महापालिका करतो. सतेज पाटील यांनी कोल्हापूर टोलची पावती फाडली, पण आम्ही कंत्राटदाराला पैसे देऊ कायमचा टोल घालवला. कोल्हापूर विमानतळाची काय अवस्था होती? स्वतःच विमान घेऊन येता येत नव्हती. आज विमानतळाची स्थिती जी आहे ते सतेज पाटील तुमच्यामुळे झालं का? देवेंद्र फडणवीस यांनी लॉबीत उभा राहून विमानतळाच्या विस्तारासाठी पैसे दिले. अंबाबाई, जोतिबा, नृसिंहवाडी मंदिराच्या विकासासाठी भरभरून पैसे दिले.

दरम्यान, यावेळी बोलताना पाटील म्हणाले, माझ्या चेहऱ्यावर जाऊ नका, दररोज बघता ना टीव्हीवर माझा चेहरा. अजूनही 24 तास आहेत, जयश्रीताई यांना भाजपकडून लढण्यास सांगा. आता माझ्या सहीने एबी फार्म देतो, नानाला मागे घ्यायला सांगतो कोण हिमालयात जाणार आहे ते बघा; बंटी पाटील आम्ही निवडणूक कशी लढतो हे तुम्हाला माहिती आहे. पंढरपूरची पुनरावृत्ती कोल्हापुरात केली जाणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

SCROLL FOR NEXT