Kolhapur: अजून 24 तास आहेत पोटनिवडणूक बिनविरोध होईल, चंद्रकांत दादांची सतेज पाटलांना ऑफर

अजून 24 तास शिल्लक आहेत, पोटनिवडणूक बिनविरोध होऊ शकते, मी सतेज पाटलांना आवाहन करतोय.
Chandrakant Patil/ Satej Patil
Chandrakant Patil/ Satej PatilSaam TV
Published On

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत (Kolhapur North Assembly By-Electio) मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष आहे. आज कॉग्रेस आणि भाजपा (Congress And BJP) या दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरले यावेळी पूर्वाश्रमीच्या भाजपाच्या नगरसेविका आणि आत्ताच्या कॉग्रेसच्या अधिकृत उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) समोरासमोर आले त्यावेळी दोघांनीही एकमेकांना नमस्कार केला. हे दोघे समोरासमोर आल्यानंतर सर्वांच्या नजरा दोघांकडे होत्या मात्र दोघांनाही स्माईल देऊन वेळ निभावली.

दरम्यान, यावेळी पत्रकारांशी बोलतना चंद्रकांत पाटील म्हणाले, 'अजून 24 तास शिल्लक आहेत, मी सतेज पाटलांना (Satej Patil) आवाहन करतो तुम्ही जयश्री जाधव यांना भाजपात द्या; त्यांना बिनविरोध करु.' अशी ऑफरच त्यांनी महाविकास आघाडीला दिली.

Chandrakant Patil/ Satej Patil
'बंटी पाटील, माणसं खाणारा माणूस'; चंद्रकांत दादांच्या टीकेला सतेज पाटलांच प्रत्युत्तर म्हणाले...

शिवाय यावेळी पाटील म्हणाले, ED एवढी संपत्ती सील करतेय की ही संपत्ती जप्त झाली तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येईल, वीज बिल माफी देता येईल, एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देता येईल अशी टीका त्यांनी आघाडीच्या नेत्यांवर केली.

तसंच शरद पवार (Sharad Pawar) ईडी गावागावात पोहचली आहे म्हणताय गावागावात भ्रष्टाचार झालाय करायचं ते करायचं आणि परत बोंबा मारत बसायचं असं ते म्हणाले. तुमच्याकडे राज्यातील सरकार 27 महिने आहे पुरावे नाहीत तुमच्याकडे भाजपाच्या नेत्यांबाबत पुरावे असतील तर न्यायालयात सिध्द करा ईडी भ्रष्टाचार करणाऱ्या भाजपाच्या नेत्याला ही सोडणार नाही असंही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com