Supreme Court Hearing on ShivSena Saam TV
महाराष्ट्र

Supreme Court Hearing on ShivSena: सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी चंद्रकांत खैरेंचं होम हवन; भद्रा मारोतीला घातलं साकडं

Chandrakant Khaire News: चंद्रकांत खैरे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद इथल्या दक्षिणमुखी मारुती मंदिरात सकाळपासून होम हवण आणि पूजा सुरू केली आहे.

डॉ. माधव सावरगावे

Supreme Court Hearing on ShivSena: महाराष्ट्राच्या दृष्टीने उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, उद्या महाराष्ट्रातील राजकीय संघर्षावर सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याची शक्यता आहे. जवळपास वर्षभरापासून सुरु असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल जाहीर करू शकते. याबाबत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी माहिती दिल्याचं 'लाईव्ह लॉ'ने म्हटले आहे. दरम्यान, ही बातमी समोर येताच सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची चांगलीच धाकधुक वाढली आहे.  (Latest Political News)

सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) निकाल शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) बाजूनं निकाल लागावा यासाठी शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज दक्षिणमुखी मारुती मंदिरात होम हवन, पूजा करून साकडे घातले.

चंद्रकांत खैरे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद इथल्या दक्षिणमुखी मारुती मंदिरात सकाळपासून होम हवण आणि पूजा सुरू केली आहे. सत्ता संघर्षाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यापासून प्रत्येक सुनावणीवेळी चंद्रकांत खैरे हे दक्षिण मुखी मारुती मंदिरात होम हवन आणि पूजा करीत आहेत.

सुप्रीम कोर्टाचा निकाल उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूनेच लागू दे, अशी प्रार्थना आपण भद्रा मारोतीकडे केली असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली. आम्ही आशावादी असल्यामुळे देव आमची प्रार्थना मान्य करेल, आणि कोर्टाचा निर्णय आमच्याच बाजूने लागेल, अशी आशा देखील खैरे यांनी व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

जनतेला निकाल लाईव्ह पाहता येणार

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाचं उद्या कोर्टातून लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. जनतेला हा निकाल लाईव्ह पाहता येणार आहे. अतिशय ऐतिहासिक असा हा निकाल असेल. त्यामुळे जनतेला कोर्टाचा निकाल थेट कोर्टातून पाहता येणार आहे. कोर्टाचा निकाल थेट टीव्हीवरुन पाहण्याची ही पहिलीच वेळ असेल.

कोर्टात नेमकं काय सुरु आहे, न्यायाधीश निकाल कसं वाचणार हे जसंच्या तसं जनतेला टीव्हीवर पाहता येणार आहे. हा निकाल ऐतिहासिक असल्याने जनतेला थेट कोर्टात सुरु असलेलं निकालाचं वाचन जसंच्या तसं पाहता येणार आहे. सुप्रीम कोर्टाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT