Chandrakant Khaire news saam tv
महाराष्ट्र

'मुख्यमंत्री चिठ्ठ्या वाचून बोलत होते'; एकनाथ शिंदेंच्या भाषणावर शिवसेना नेत्याची टीका

'मुख्यमंत्री हे चिठ्ठ्या वाचून बोलत होते, अशा शब्दात शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी टीका केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

Chandrakant khaire news : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज, सोमवारी औरंगाबादच्या पैठणमध्ये सभा झाली. या सभेतून मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेते आणि ठाकरे कुटुंबावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेतृत्वावर टीका केल्यानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.'मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यात कुठेही तथ्य नव्हतं. मुख्यमंत्री हे चिठ्ठ्या वाचून बोलत होते, अशा शब्दात शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात तुफान गर्दीत सभा झाली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेतृत्वावर जोरदार टीका केली. त्यानंतर शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैठणमधील फक्त २५ टक्के होते. सभेत गर्दी जमवण्यासाठी पैसे देऊन बाहेरून लोक आणली होती. या सभेला महिलांना ३०० रुपये आणि पुरुषांना ५०० रुपये देऊन गर्दी केलेली होती. हे पैसे देऊन गोळा केलेली सभा होती'.

'मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यात कुठेही तथ्य नव्हतं. मुख्यमंंत्री चिठ्ठ्या वाचून बोलत होते. बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चालला आहात, तर बाळासाहेबांनी शेवटी आदेश दिला होता की, माझ्या उद्धव आणि आदित्य यांना सांभाळा. मग हे त्यांनाच सोडून का चालले आहे ?, असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्र्यांना केला.

'संदिपान भुमरे एकदम दिमाखात बसलेले होते. त्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल. या सभेपेक्षा आदित्य ठाकरे यांच्या सभेला जास्त गर्दी होती. मराठी टक्केवारी वाढवण्यासाठी तुम्ही नगर विकास मंत्री होता, तेव्हा का फिरले नाहीत? स्टाईलने शब्द दिला की स्वतःचं ऐकत नाही, म्हणायला काय जातंय ? शिवसेना सोडून गद्दारी केली, तेव्हा कुठे गेला होता शब्द'. असेही चंद्रकांत खैरे पुढे म्हणाले,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahabharat: महाभारताचे पुरावे सापडले? कुरुक्षेत्रात सापडला रथ, महाकाय गदा?

Maharashtra Politics: सुजय विखेंनी दिले वडिलांना राजकारणाचे धडे,'विरोधकांपेक्षा गाडीत बसणाऱ्यांपासून सावध राहा'

Buldhana Crime: सकाळी-सकाळी डोकं फिरलं, सपासप कुऱ्हाडीने वार करत आई-बाबाला संपवलं; नंतर स्वतःला लावला फास

Maharashtra Politics: भाजप कुबड्या काढणार? भाजप अजितदादा-शिंदेंना रोखणार?

Maharashtra Live News Update: चंद्रकांत पाटील उद्या पुणे पोलीस आयुक्तांना भेटणार, कायदा व सुव्यवस्थेच्याबाबत घेणार आढावा

SCROLL FOR NEXT