Sangli News
Sangli News  Saam Tv
महाराष्ट्र

Sangli News : 'राज्यात कुस्तीचा 'सांगली पॅटर्न' सुरू करु', महाराष्ट्र केसरीतील वादानंतर चंद्रहार पाटलांचं वक्तव्य

विजय पाटील

Sangli Latest News : कुस्ती क्षेत्रातील लोकांकडून पैलवानांवर अन्याय सुरू आहे आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पैलवानांच्यावर अन्याय होत आला आहेअसा आरोप डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केला आहे.

तसेच महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) कुस्ती स्पर्धेमध्ये होत, असलेले वाद हे कायमस्वरूपी टाळण्यासाठी सांगलीमध्ये यंदाची "महाराष्ट्र केसरी कुस्ती" स्पर्धा भरवण्याचा आपला मानस असून या स्पर्धेसाठी एक कोटींचे बक्षीस देखील आपली देण्याची तयारी असल्याचे पैलवान चंद्रहार पाटील यांनी जाहीर केला आहे.

महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा सांगलीत झाल्या तर त्या विना तक्रार आणि वादा-विना होऊ शकतात. सांगलीत कुस्ती स्पर्धा यशस्वी करून दाखवून देऊ,त्यानंतर कुस्तीचा सांगली (Sangli) पॅटर्न महाराष्ट्रात सुरू होईल, असा विश्वास देखील पैलवान चंद्रहार पाटलांनी व्यक्त केला आहे.

तसेच पैलवानांवर अन्याय झाल्यास तो आत्महत्या पर्यंत जातो आणि मी देखील महराष्ट्र केसरी स्पर्धेत माझ्यावर झालेल्या अन्यायानंतर आत्महत्याच्या निर्णयापर्यंत पोहोचलो होतो. मात्र त्यातून सावरलो आहे. पण ज्या चार माकडांनी माझ्यावर अन्याय केला, त्यांना माझं सांगणं आहे की कोणत्याही पैलवानावर आता अन्याय करू नका, असा इशारा देखील पैलवान चंद्रहार पाटील यांनी दिला आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Juggad Viral Video: गर्मीपासून वाचण्यासाठी अनोखा जुगाड! चक्क घराच्या छतावर बसवले कारंजे; VIDEO VIRAL

Viral Video: संपत्तीसाठी लेकाचे राक्षसी कृत्य! जन्मदात्याला लाथा- बुक्क्यांनी बेदम मारहाण; वडिलांचा मृत्यू.. घटना CCTVत कैद

Girl Death While Dancing: हळदीत नाचता नाचता तरूणीचा मृत्यू; धक्कादायक घटनेचा VIDEO व्हायरल

Social Media Influencer व्हायचंय? या गोष्टी आत्मसात करा

Girl Child Name: शास्त्रानुसार ठेवा तुमच्या मुलीच नाव, अर्थही जाणून घ्या

SCROLL FOR NEXT