Chandoli National Park Saam TV
महाराष्ट्र

Chandoli National Park: सांगलीचं राष्ट्रीय उद्यान पर्यटनासाठी बंद; कारण काय? परत केव्हा सुरु होणार

Sangali's Chandoli National Park News: पावसाळा सुरू झाल्याने आजपासून उद्यान पर्यटकांसाठी बंद होणार असल्याची माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनरक्षक कविता सावंत यांनी दिली.

Ruchika Jadhav

विजय पाटील, सांगली

पर्यटकांचे आकर्षण असलेले सांगलीमधील चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी बंद झाले आहे. चांदोली परिसरातील धरण यापूर्वीच म्हणजे 11 जूनपासून बंद करण्यात आले आहे. आता चांदोली राष्ट्रीय उद्यानही पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. पावसाळा सुरू झाल्याने आजपासून उद्यान पर्यटकांसाठी बंद होणार असल्याची माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनरक्षक कविता सावंत यांनी दिली.

या तारखेपर्यंत राहणार बंद

चांदोली राष्ट्रीय उद्यान 17 जूनपासून बंद करण्यात आलं आहे. हे उद्यान एकूण ४ महिने बंद राहणार आहे. त्यामुळे 15 ऑक्टोबरपर्यंत उद्यान बंद असणारे.

मे महिन्यात झालेल्या गणनेत अनेक प्रजातीचे प्राणी पक्षी आढळले होते. हरणे, सांबर रानकुत्री, ससे, पिसोरी, गवे, रेडे, उदमांजर, माकड, साळींदर, मुंगूस, शेकरू वटवाघुळ, चुकत्री रान कोंबडा, घुबड, सर्प, गरुड, मोर, पर्वती, कस्तुर पांढऱ्या गालाचा लाल बुडाचा बुलबुल, केसरी डोक्याची कस्तुर, धामण, घोरपड अशा दोनशेहून अधिक प्राण्यांची नोंद झाली आहे.

उद्यानात कसं पोहचायचं?

३१७.६७ किमी २ क्षेत्र असलेले चांदोली हे राष्ट्रीय उद्यान सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांच्या मधोमध येते. वारणा नदीचा उगमही येथेच होतो. त्यामुळे येथे जाण्यासाठी सांगली किंवा कोल्हापूर स्टेशनला उतरल्यावर बसमधून तुम्ही उद्यानापर्यंत पोहचू शकाल.

चांदोली अभयारण्यात जाण्यासाठी बाय रोड आणखी २-३ मार्ग आहेत.

कराडवरुन शेडगेवाडी आणि तेथून आरळाहून सरळ वारणावती असा प्रवास करून तुम्ही येथे पोहचाल.

कराडहून जुळेवाडीला गेल्यावर देखील उद्यानात पोहचता येईल.

तिसरा मलकापूरहून लाव्ह्ळे फाट्याला उतरून कच्च्या रस्त्याने तुम्ही या ठिकाणी पोहचू शकता.

रत्‍नागिरीहून संगमेश्वर आणि तिथून नायरी गावापर्यंत पायवाटेने प्रचितगडावर जाऊन अभयारण्यात पोहोचता येते.

प्राण्यांची संख्या

या उद्यानात एकूण ३ वाघ आहेत. तर २५ बिबटे आणि ३५० ते ४०० गवा आहेत. यासह यामध्ये २५० ते ३०० सांबरही आहेत. तर १०० अस्वल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! डान्स अन् अभिनयाची आवड जोपासत केली UPSC क्रॅक; IPS श्रृती अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास

Wednesday Horoscope : दिवसभरात आर्थिक चणचण भासणार, प्रेमामध्ये अपयश मिळणार; ५ राशींच्या लोकांचं टेन्शन वाढणार

Gajkesri Rajyog 2025: 22 जुलैला बनणार पॉवरफुल गजकेसरी राजयोग; 'या' ३ राशींना मिळणार पैसाच पैसा

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

SCROLL FOR NEXT