Weather : राज्यात जोरदार पावसाची शक्यता; या जिल्ह्यांना हवामान खात्याचा हाय अलर्ट Saam Tv
महाराष्ट्र

Weather : राज्यात जोरदार पावसाची शक्यता; या जिल्ह्यांना हवामान खात्याचा हाय अलर्ट

यंदाचे नैऋत्य मोसमी वारे माघारी परतल्यावर महाराष्ट्रासह देशात काही ठिकाणी पावसाने पूर्णपणे उघड झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : यंदाचे नैऋत्य मोसमी वारे माघारी परतल्यावर महाराष्ट्रासह देशात काही ठिकाणी पावसाने Rain पूर्णपणे उघड झाले आहे. दरम्यान दक्षिण आणि ईशान्य भारतात मात्र, काही ठिकाणी जोरदार पाऊस Heavy rainfall कोसळला आहे. मान्सूनच्या परतीवर राज्यामध्ये पावसाने उसंत झेप घेतली होती. पण आता राज्यात परत एकदा पावसाकरिता पोषक हवामान निर्माण होतं आहे. यामुळे नोव्हेंबरची सुरुवात पावसाने होणार आहे.

हे देखील पहा-

हवामान खात्याने १ आणि २ नोव्हेंबर दिवशी राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १ आणि २ नोव्हेंबर दिवशी हवामान खात्याने दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी १ नोव्हेंबर दिवशी रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या ५ जिल्ह्यात येलो अलर्ट Yellow Alert जारी करण्यात आला आहे.

याठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रायगड, सोलापूर आणि पुण्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात पावसाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २ नोव्हेंबर दिवशी राज्यात रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या ५ जिल्ह्यांना परत एकदा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

याबरोबरच पुणे, रायगड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत देखील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे संबंधित परिसरात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. दक्षिण- पूर्ण बंगालच्या उपसागरामध्ये ४ ते १० नोव्हेंबर दरम्यान हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय होणार आहे. पण हे कमी दाबाचे क्षेत्र तीव्र न होता, सामान्य अवस्थेतचे पश्चिम दिशेने पुढे सरकणार आहे. यामुळे दक्षिण भारतात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात देखील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT