Dengue Disease Saam tv
महाराष्ट्र

Dengue Disease: १४ वर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू; चाळीसगावात यंत्रणा अलर्ट

Chalisgaon News : १४ वर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू; चाळीसगावात यंत्रणा अलर्ट

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : जळगाव जिल्ह्यात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. या आता चाळीसगाव (Chalisgaon) शहरात देखील डेंग्यूने डोके वर काढले असून नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा डेंग्यूची (Dengue) लागण होऊन मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. (Breaking Marathi News)

चाळीसगाव शहरातील नारायणवाडी परिसरात राहणारा यश विवेक काळे (वय १४) याला मागील चार- पाच दिवसांपासून ताप आला होता. त्याला उपचारासाठी डॉक्टरांकडे दाखवल्यानंतरही ताप पूर्णतः उतरला नव्हता. शनिवारी (ता. ३०) पुन्हा ताप आल्याने दुसऱ्या डॉक्टरांकडे दाखवले. डॉक्टरांनी गोळ्या, औषधी दिल्यानंतर रविवारी (ता. १) पुन्हा त्याची तब्येत बिघडली (Hospital) व अचानक चक्कर आले. कुटुंबीयांनी त्याला तत्काळ शहरातील डॉ. वाघ यांच्या दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला तपासून नाशिक येथे नेण्यास सांगितले. 

अखेर प्राणज्योत मालवली 

त्यानुसार, नाशिक येथील खासगी रुग्णालयात यशला दाखल केले असता, त्याच्यावर उपचार सुरु असताना सोमवारी (२ ऑक्टोबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याच्या रक्ताचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर यशला डेंग्यूची लागण झाल्याचे डॉ. वाघ यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीती पसरली असून पालिकेने आणखीन दुसरा बळी जाण्याची वाट न पाहता, या भागात तत्काळ स्वच्छता करुन डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Raid On Lodge: लॉजमधील एका रुममध्ये २० मुलं-मुली; पोलिसांच्या धाडीनंतर उघडकीस आला खोलीतील भयानक प्रकार

Cricket Rules:क्रिकेटच्या नियमात मोठे बदल; BCCI कोणते नवीन नियम लागू करणार?

बॉलीवूडच्या भाईजानला झालंय काय?भाईजानच्या नव्या लूकमुळे चाहत्यांना चिंता, सलमान आजारी की प्रमोशन फंडा?

Maharashtra News Live Update: पुण्यातील नवले पुलावरील सेल्फी पॉईंटजवळ चारचाकी वाहनाला लागली आग

एक राजीनामा घेऊ शकत नाहीत, नरेंद्र मोदी सर्वाधिक तरुणविरोधी पंतप्रधान; राहुल गांधींची घणाघाती टीका

SCROLL FOR NEXT