केंद्रीय पथकाने केली महाड, पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त भागाची पाहणी राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

केंद्रीय पथकाने केली महाड, पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त भागाची पाहणी

केंद्रीय पथकाने महाड, पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त भागाची पाहणी केली आहे. येथील दरड दुर्घटनेचा अहवाल केंद्राकडे सादर करण्यात येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड : केंद्रीय पथकाने महाड, पोलादपूर तालुक्यातील दरड भागाची पाहणी केली आहे. तळीये, केवनाळे, साखर सुतारवाडी येथील दरड दुर्घटनेच्या ठिकाणी या अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. येथील दरड दुर्घटनेचा अहवाल केंद्राकडे सादर करण्यात येणार आहे. (Central team inspects the affected area in Mahad and Poladpur taluka)

हे देखील पहा -

महाड, पोलादपूर तालुक्यात झालेल्या दरड दुर्घटनेबाबत पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय पथक रायगडात दाखल झाले. महाड तालुक्यातील तळीये, पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, साखर सुतारवाडी याठिकाणी झालेल्या दरड दुर्घटनेच्या ठिकाणी जाऊन पथकाने पाहणी केली. चार जणांच्या केंद्रीय पथकासोबत, कोकण आयुक्तालय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पाहणी दौऱ्याला उपस्थित होते.

केंद्रीय पथकाने दरड दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी करून माहिती घेतली. दरड दुर्घटनेबाबत अहवाल तयार करून तो केंद्राकडे सादर केला जाणार आहे. त्यामुळे दरड दुर्घटना पुन्हा घडू नये तसेच यामध्ये जीवितहानी होऊ नये यादृष्टीने आता केंद्राकडूनही पावले उचलण्याची शक्यता आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: हालाखीची परिस्थिती, शाळेसाठी रोज ६ किमी पायपीट; मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

SCROLL FOR NEXT