झिका वायरसचा रुग्ण आढळलेल्या बेलसर गावाची केंद्रीय पथकाकडून पाहणी मंगेश कचरे
महाराष्ट्र

झिका वायरसचा रुग्ण आढळलेल्या बेलसर गावाची केंद्रीय पथकाकडून पाहणी

पुणे जिल्ह्यातल्या बेलसर मध्ये झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. केंद्रीय पथकाकडून आज गावची पाहणी करुन प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला

मंगेश कचरे

बारामती : पुणे जिल्ह्यातल्या बेलसर मध्ये झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. केंद्रीय पथकाकडून आज गावची पाहणी करुन प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. हे पथक बेलसर गावची पाहणी केंद्राकडे अहवाल पाठवणार आहे. 30 जुलै रोजी राज्यात पहिल्यांदा झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्यासह जिल्हा प्रशासनाची आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन या गावात तातडीने उपाययोजना सुरू केल्या होत्या.

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांपासून केंद्रीय पथक राज्यात दाखल झाले आहे. त्यांनी दोन दिवस जिल्हा प्रशासनाशी बैठकांचे सत्र केल्यानंतर आज बेलसर गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी स्थानिक प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची देखील त्यांनी माहिती घेतली. याशिवाय घरोघरी जावून ग्रामस्थांशी संवाद साधला तसेच ग्रामस्थांनी घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती दिली.

हे देखील पहा -

दिल्लीतून सर्वेक्षण करण्यासाठी कुटुंब कल्याण मंत्रालयानं हे पथकं पाठवलं आहे. दिल्लीच्या लेडी हार्डींग वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.शिल्पी नैन, डॉ.हिंमत सिंग यांच्यासह राष्ट्रीय हिवताप संशोधन केंद्रातील किटकतज्ज्ञांचा या पथकात समावेश आहे. बेलसर गावाची पाहणी करुन हे पथक केंद्राला अहवाल देणार आहे.

तीन सदस्य असलेल्या या केंद्रीय पथकाने झिका बाधित पुरंदरच्या बेलसर गावात दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा गावातल्या स्थानिक प्रशासन आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत बैठक केली. या बैठकीत केंद्रीय पथकाने स्थानिक अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली व त्यानंतर बेलसर गावाची पाहणी केली.

झिका व्हायरसने संसर्ग झालेली महिला बेलसर मध्ये पहिल्यांदा आढळल्याने आम्ही या भागाचा दौरा करून राज्य सरकारने योग्य उपाययोजना राबवल्या आहेत का या संदर्भात केंद्र सरकारला अहवाल देणार आहोत. यापूर्वी केरळमध्ये झिका वायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले होते. झिका वायरस वाढण्यासाठी मच्छर कारणीभूत आहेत. त्यांना कंट्रोल करणे आवश्यक आहे.

या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने योग्य खबरदारी घेत उपाय योजना राबवल्या असल्याने या पथकातील शिष्टमंडळाने समावेश समाधान व्यक्त केले. गर्भवती महिलांमध्ये हा संसर्ग विकसनशील गर्भास गंभीरपणे हानी पोहोचवू शकतो आणि त्यामुळे बालकांमध्ये जन्मजात विसंगती निर्माण होऊ शकतात. हा झिका व्हायरस डासांमुळे होतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Maharashtra Live News Update : भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, आरपीआयची मागणी

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

SCROLL FOR NEXT