Mumbai Train Power Block  Saam tv
महाराष्ट्र

Mumbai Train: मध्य रेल्वेचा पॉवर ब्लॉक; ब्लॉकमुळे वाहतुकीवर होणार परिणाम, जाणून घ्या ट्रेनचं वेळापत्रक

Mumbai Train Power Block: शनिवारी आणि रविवारी मध्य रेल्वेच्या मार्गावर पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण ते बदलापूरदरम्यान हा ब्लॉक असणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मध्य रेल्वेकडून पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण आणि बदलापूर दरम्यान नवीन पाइपलाइन पुलाच्या बांधकामासाठी शनिवारी पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दोन्ही स्टेशन दरम्यान विद्यमान रोड ओव्हर ब्रिजच्या गर्डर्सचे डि-लाँचिंग केलं जाणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वे या मार्गावर दिनांक २९ आणि ३० तारखेला म्हणजेच शनिवार आणि रविवारी रात्री अप आणि डाउन मार्गांवर वाहतूक कमी प्रमाणात असेल. ब्लॉकच्या कालावधीत विशेष वाहतूक सेवा पुरवली जाणार आहे.

कल्याण आणि बदलापूर दरम्यानच्या विद्यमान रोड ओव्हर ब्रिजच्या गर्डर्सचे डि-लाँचिंग करण्यासाठी पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण आणि बदलापूरदरम्यान नवीन पाइपलाइन पुलाच्या बांधकामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप आणि डाउन मार्गावरील विद्यमान रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) च्या ४ गर्डर्सचे डि-लाँचिंग करण्यासाठी दोन रोड क्रेनचा वापर केला जाणार आहे. या मार्गावर विशेष वाहतूक सेवा दिली जाणार आहे.

हा ब्लॉक दिनांक ३०.०३.२०२५ (शनिवार/रविवारच्या मध्यरात्री) रोजी ०१.३० वाजता ते दिनांक ३०.०३.२०२५ (रविवार पहाटे) रोजी ०४.३० वाजता अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान परिचालित करण्यात येईल.

ब्लॉकमुळे पुढीलप्रमाणे परिणाम होतील:

अप मेल/एक्सप्रेस गाड्या वळवण्यात येतील.

खालील गाड्या कर्जत -पनवेल -दिवा मार्गे वळवण्यात येतील.

ट्रेन क्रमांक 11020 भुवनेश्वर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस,

ट्रेन क्रमांक 18519 विशाखापट्टणम - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस,

ट्रेन क्रमांक 12702 हैदराबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसेनसागर एक्सप्रेस,

ट्रेन क्रमांक 11140 होसपेट - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस आणि

ट्रेन क्रमांक 22158 चेन्नई- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

कल्याण येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या फायद्यासाठी कल्याणला नियोजित थांबा असलेल्या गाड्यांना ठाणे येथे थांबा देण्यात येईल.

अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे नियमन

ट्रेन क्रमांक 22178 सिकंदराबाद -राजकोट एक्सप्रेस ०४.१० ते ०४.३० वाजेपर्यंत वांगणी स्टेशनवर नियंत्रित केली जाईल.

ट्रेन क्रमांक 11022 तिरुनेलवेली -दादर एक्सप्रेस ०४.१७ ते ०४.२७ वाजेपर्यंत नेरळ स्टेशनवर नियंत्रित केली जाईल. उशिराने चालणाऱ्या मेल/एक्सप्रेस गाड्या/हॉलिडे विशेष गाड्या ऑपरेशनल गरजेनुसार वळवल्या जातील.

ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे काम

ब्लॉक कालावधीत अंबरनाथ आणि कर्जत स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

उपनगरीय गाड्यांचा विस्तार / शॉर्ट टर्मिनेशन / शॉर्ट ओरिजिनेशन

परळ येथून २३.१३ वाजता सुटणारी (पीए३) परळ- अंबरनाथ लोकल बदलापूरपर्यंत चालवण्यासाठी वाढवली जाईल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.५१ वाजता सुटणारी (बीएल६१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- बदलापूर लोकल अंबरनाथ येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.१२ वाजता सुटणारी (एस१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कर्जत लोकल अंबरनाथ येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.

कर्जत येथून ०२.३० वाजता सुटणारी (एस२) कर्जत - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल अंबरनाथ येथून शॉर्ट ओरीजनेट केली जाईल आणि अंबरनाथ येथून ०३.१० वाजता सुटेल.

कर्जत- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष लोकल कर्जत येथून ०४.१० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०६.०८ वाजता पोहोचेल. हे ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT