Central Railway Saam tv
महाराष्ट्र

Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ट्रेनचे दोन डबे रुळावरून घसरले

Central Railway Disruption : बुलढाण्यातून नागपूरकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही सेवा सायंकाळी ५ वाजेपासून ठप्प झली आहे.

Vishal Gangurde

मलकापूर स्टेशनवर मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले

डबे घसरल्यामुळे घटनेमुळे नागपूरकडे जाणारी डाऊन मार्ग ठप्प

रुळ बदलणाऱ्या यंत्रणेत बिघाडामुळे अपघात झाल्याची माहिती

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाण्यातून मोठी बातमी हाती आली आहे. बुलढाण्यात मध्य रेल्वेची नागपूरकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. बुलढाण्यातील मलकापूर रेल्वे स्टेशनवर रुळावरून मालगाडीचे डबे घसरल्याची घटा घडली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या घटनेनंतर नागपूरकडे जाणारी वाहतूक सायंकाळी 5 वाजतापासून डाऊन ठप्प झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवर पुन्हा एकदा रेल्वेचे डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर रेल्वे स्टेशनवर आज मंगळवारी ५ वाजता मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरल्याने डाऊन रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

या दुर्घटनेनंतर तातडीने रेल्वे विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांना रेल्वेचे डबे रुळावर ठेवण्यात यश आल्याची माहिती मिळत आहे. रुळ बदलणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. काही तासांत मध्य रेल्वेची डाऊनची सेवा पूर्ववत होईल, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.

डबे रुळावरून घसरल्याची दुर्घटना कुठे घडली?

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर रेल्वे स्टेशनवर आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घटना घडली.

मलकापूर रेल्वे स्टेशनवर नेमकं काय घडलं?

मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली. यामुळे मध्य रेल्वेची डाऊन लाइन पूर्णपणे विस्कळीत झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Roti: या ५ दिवशी घरात कधीही भाकरी शिजवू नये; पाहा वास्तू शास्त्र काय सांगतं?

Maharashtra Live News Update: भाजपकडून रामराव वडकुते यांना राज्यसभेची उमेदवारी

पार्थ पवार राज्यसभेसाठी दाखल करणार उमेदवारी अर्ज, पाहा व्हिडिओ

Summer Hair Care Tips: उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्याल?

BMC Recruitment: बृहन्मुंबई महापालिकेत भरती! ९००० पदांसाठी घोषणा; कधी होणार प्रक्रिया?

SCROLL FOR NEXT