Central Railway Summer Special Trains Saam Tv
महाराष्ट्र

Summer Special Trains : सुट्ट्यांसाठी खास रेल्वे सेवा, २७८ अनारक्षित गाड्यांसह ९८६ उन्हाळी विशेष गाड्या धावणार; वाचा वेळापत्रक

Central Railway Special Trains : उन्हाळ्यात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, गर्दीमुळे प्रवास करताना त्रास होऊ नये यासाठी मध्य रेल्वेने नियमित गाड्यांच्या व्यतिरिक्त २७८ गाड्यांसह ९८६ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.

Yash Shirke

मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन आपल्या नियमित गाड्यांव्यतिरिक्त आजपर्यंत २७८ अनारक्षित गाड्यांसह ९८६ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेने यापूर्वी उन्हाळी विशेष गाड्यांच्या ८५४ सेवांची घोषणा केली होती आणि आता प्रवाशांच्या हितासाठी १३२ अतिरिक्त सेवा चालवणार आहे.

१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - खोरधा रोड साप्ताहिक विशेष गाड्या (२६ सेवा)

01049 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक ५.०४.२०२५ ते दिनांक २८.०६.२०२५ पर्यंत दर शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ११.०५ वाजता सुटेल आणि खोरधा रोड येथे तिसऱ्या दिवशी ००.५५ वाजता पोहोचतील. (१३ सेवा)

01050 साप्ताहिक विशेष दिनांक ७.०४.२०२५ ते दिनांक ३०.०६.२०२५ पर्यंत दर सोमवारी खोरधा रोड येथून दुपारी २.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १२.५५ वाजता पोहोचेल. (१३ सेवा)

थांबे: दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलबुरगि, वाडी, विकाराबाद, सिकंदराबाद, गुंटूर, विजयवाडा जंक्शन, राजमंड्री, सामलकोट जंक्शन. पिठापुरम, दुव्वाडा, कोत्तवलसा विजयनगरम, श्रीकाकुलम रोड, पलासा, ब्रह्मपुर आणि बालुगांव

संरचना: चार द्वितीय वातानुकूलित, सहा तृतीय वातानुकूलित, ४ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरल व्हॅन.

२. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नारंगी साप्ताहिक विशेष (८ सेवा)

01065 साप्ताहिक विशेष दिनांक १०.०४.२०२५ ते ०१.०५.२०२५ पर्यंत दर गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.०५ वाजता सुटेल आणि नारंगी येथे तिसऱ्या दिवशी ११.०० वाजता पोहोचेल. (४ सेवा)

01066 साप्ताहिक विशेष दिनांक १३.०४.२०२५ ते ०४.०५.२०२५ पर्यंत दर रविवारी नारंगी येथून सकाळी ०५.२५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ०८.२५ वाजता पोहोचेल. (४ सेवा)

थांबे: दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपुर, कटनी, सतना, माणिकपुर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर, पाटलीपुत्र, हाजीपुर, बरौनी, बेगूसराय, खगड़िया, नवगछिया, कटिहार, किशनगंज, अलुबारी रोड, न्यू जलपाईगुड़ी, न्यू कौचिबिहार, कोकराझार, न्यू बोंगाईगांव, रंगिया कामाख्या आणि गुवाहाटी

संरचना: एक द्वितीय वातानुकूलित, पाच तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

३. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - रीवा साप्ताहिक अतिजलद विशेष (२४ सेवा)

02188 साप्ताहिक अतिजलद विशेष दिनांक ११.०४.२०२५ ते २७.०६.२०२५ पर्यंत दर शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी १३.३० वाजता सुटेल आणि रीवा येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ९.४५ वाजता पोहोचेल. (१२ सेवा)

02187 साप्ताहिक अतिजलद विशेष दिनांक १०.०४.२०२५ ते दिनांक २६.०६.२०२५ पर्यंत दर गुरुवारी रीवा येथून दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२० वाजता पोहोचेल. (१२ सेवा)

थांबे: दादर, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, हरदा, इटारसी, पिपरिया, गदरवाडा, नरसिंहपुर, जबलपुर, कटनी, मैहर आणि सतना.

संरचना: एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

४. कोल्हापूर - कटिहार साप्ताहिक विशेष (८ सेवा)

01405 साप्ताहिक विशेष दिनांक ०६.०४.२०२५ ते दिनांक २७.०४.२०२५ पर्यंत दर रविवारी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून सकाळी ०९.३५ वाजता सुटेल आणि कटिहार येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ०६.१० वाजता पोहोचेल. (४ सेवा)

01406 साप्ताहिक विशेष दिनांक ०८.०४.२०२५ ते दिनांक २९.०४.२०२५ पर्यंत दर मंगळवारी कटिहार येथून १८.१० वाजता सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे तिसऱ्या दिवशी १५.३५ वाजता पोहोचेल. (४ सेवा)

थांबे: मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, दौंड चोर केबिन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर, पाटलीपुत्र, हाजीपूर, बरौनी, बेगूसराय, खगड़िया आणि नवगछिया

संरचना: एक द्वितीय वातानुकूलित, पाच तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

५. लातूर - हडपसर द्वि-आठवड्यातील विशेष गाड्या (१४ सेवा)

01429 द्वि-साप्ताहिक विशेष दिनांक ७.०४.२०२५ ते दिनांक २८.०४.२०२५ पर्यंत दर सोमवार आणि शुक्रवारी लातूर येथून सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि हडपसर येथे त्याच दिवशी १५.३० वाजता पोहोचतील. (७ सेवा)

01430 द्वि-साप्ताहिक विशेष दिनांक ७.०४.२०२५ ते दिनांक २८.०४.२०२५ पर्यंत दर सोमवार आणि शुक्रवारी हडपसर येथून दुपारी ४.०५ वाजता सुटतील आणि लातूर येथे त्याच दिवशी रात्री २१.२० वाजता पोहोचेल. (७ सेवा)

थांबे: हरंगुळ, उस्मानाबाद, बारसी टाउन, कुर्डुवाडी, जेऊर आणि दौंड.

संरचना: एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, दोन द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

६. हडपसर - राणी कमलापती साप्ताहिक विशेष (२४ सेवा)

01668 साप्ताहिक विशेष दिनांक ११.०४.२०२५ ते दिनांक २७.०६.२०२५ पर्यंत दर शुक्रवारी हडपसर येथून सकाळी ६.३० वाजता सुटेल आणि राणी कमलापती येथे त्याच दिवशी रात्री २२.५५ वाजता पोहोचेल.

(१२ सेवा)

01667 साप्ताहिक विशेष दिनांक १०.०४.२०२५ ते दिनांक २६.०६.२०२५ पर्यंत दर गुरुवारी राणी कमलापती येथून सकाळी ८.३५ वाजता सुटेल आणि हडपसर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ००.३० वाजता पोहोचेल. (१२ सेवा)

थांबे: दौंड कॉर्ड केबिन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी आणि नर्मदापुरम.

संरचना: दोन द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, ७ वातानुकूलित-तृतीय इकॉनॉमी, ५ शयनयान, २ सामान्य द्वितीय श्रेणी, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.

७. पुणे-इंदूर साप्ताहिक विशेष (२८ सेवा)

09323 पुणे - इंदूर साप्ताहिक विशेष, पूर्वी दिनांक २०.०३.२०२५ पर्यंत चालविण्यासाठी सूचित केली होती, आता दिनांक २७.०३.२०२५ पासून दिनांक २६.०६.२०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. (१४ सेवा)

09324 इंदूर - पुणे साप्ताहिक विशेष, पूर्वी दिनांक १९.०३.२०२५ पर्यंत चालविण्यासाठी सूचित केली होती, आता दिनांक २६.०३.२०२५ पासून दिनांक २५.०६.२०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. (१४ सेवा)

विशेष सेवा चालण्याच्या दिवसांमध्ये, वेळेत, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही.

आरक्षण :

विशेष ट्रेन क्रमांक 01049, 01065, 02188, 01405, 01429, 01430 आणि 01668 चे बुकिंग दिनांक ३१.०३.२०२५ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

विशेष ट्रेन क्रमांक 09323/09324 च्या विस्तारित सेवांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग आधीच सुरू आहे.

अतिजलद मेल / एक्सप्रेस ट्रेनसाठी लागू असलेल्या अनारक्षित साठी सामान्य शुल्कासह अनारक्षित कोचसाठी तिकिटे यूटीएस द्वारे बुक करता येतात.

तपशीलवार वेळापत्रक आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

SCROLL FOR NEXT