Nitin Gadakari News
Nitin Gadakari News Saamtv
महाराष्ट्र

Nitin Gadkari News: मुंबई-गोवा महामार्गाविषयी स्वत: नितीन गडकरींनी दिली मोठी अपडेट, म्हणाले...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन कदम...

Ratnagiri News: महामार्गांवरील ब्लॅक स्पॉट शोधून त्यावर उपाय योजना कराव्यात यासाठी जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली आहे. देशात दरवर्षी ५ लाख अपघातात दीड लाख मृत्यूमुखी पडतात असे सांगत हे अपघात टाळण्यासाठी समिती तयार करण्यात आल्याचे नितिन गडकरी म्हणाले.

नितीन गडकरी आज रायगड दौर्‍यावर आले असून यावेळी त्यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते कासु या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भुमीपुजन केले. यावेळी कार्यक्रमात ते बोलत होते. (Latest Marathi News)

अपघात निवारण समिती तयार होणार...

कार्यक्रमात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी वाढत्या रस्ते अपघातांवर (Road Accident) चिंता व्यक्त केली. कोविडमुळे, युद्धामुळेही मरत नाहीत, त्यापेक्षा जास्त जीव रस्ते अपघातात गमवावे लागतात असे म्हणत लेन डिसिल्पिनचे महत्व नितीन गडकरी यांनी विषद केले. वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी अपघात निवारण समिती स्थापन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या समितीच्या मार्फत दर दोन महिन्यांनी ब्लॅक स्पॉट, अपघात स्थळांची पाहणी करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या...

सॅटेलाईट टोलनाके...

यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी सॅटेलाईट टोलनाक्यांची नवी संकल्पना बोलून दाखवली. या पुढे टोल नाके रद्द करणार असून सॅटेलाईट बेस टोलनाके सुरु करण्याचा विचार असल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच पळस्पे ते इंदापूर या मार्गाचे काम यावर्षी डिसेंम्बरच्या आत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता तयार करण्याचा प्रयत्न असल्याचा विचारही त्यांनी बोलून दाखवला...

मुंबई गोवा महामार्गाची केली हवाई पाहणी...

या दौऱ्यावेळीच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांन मुंबई गोवा महामार्गाच्या (Mumbai- Goa Highway) चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी केली. यावेळी हेलिकॉप्टरमधून त्यांच्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) हे देखील उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी मार्गाच्या कामाच्या प्रगतीचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. तसेच अपूर्ण राहिलेल्या कामांसंदर्भात अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS Leader Avinash Jadhav: सराफ व्यापाऱ्याकडे ५ कोटी मागितले? मनसे नेते अविनाश जाधवांनी आराेप फेटाळले

Rahul Gandhi News: पराभवाची भिती की रणनिती? राहुल गांधींनी अमेठी मतदार संघ का सोडला? वाचा काँग्रेसच्या खेळीची इनसाईड स्टोरी

Today's Marathi News Live : ठाणे लोकसभेतून नरेश म्हस्के यांनी उमेदवारी अर्ज भरला

Thane MNS News | मनसेच्या नेत्याने मागितली खंडणी? पोलिसांकडून गुन्हा दाखल

New Force Gurkha: ऑफ-रोडींगसाठी आहे बेस्ट! पॉवरफुल Force Gurkha भारतात लॉन्च; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

SCROLL FOR NEXT